पाटणला झाला महाविकास आघाडीचा संवाद मेळावा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पाटण (जि. सातारा) येथील महाविकास आघाडीचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
या संवाद मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आ.बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस हिंदुराव पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना उ.बा.ठाकरे सातारा जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम , शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे व राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष सुरेश जाधव या मान्यवरांनी उपस्थितीत राहून मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, आजी/माजी जि.प.सदस्य, आजी/माजी पं.स.सदस्य, आजी/माजी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविका, आजी/माजी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील यांची अनुपस्थितीची चर्चा…
साताऱ्याचे खासदार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बलाढ्य नेते श्रीनिवास पाटील तसेच तसेच त्यांचे पूत्र सारंग पाटील हे होम पिचवर झालेल्या या मेळाव्याला अनुपस्थित राहिले. याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.