डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडून घारेवाडी, किरपे, येणकेत मतदारांशी संवाद – changbhalanews
राजकिय

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडून घारेवाडी, किरपे, येणकेत मतदारांशी संवाद

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
भाजपा – महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा प्रचार दौरा घारेवाडी, किरपे, येणके परिसरात पार पडला. या प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. डॉ. अतुलबाबांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये सुमारे ७५० कोटी रुपयांची विकासकामे आणली आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला मिळवून दिला आहे. त्यामुळे अशा कर्तृत्ववान युवानेत्याला या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

याप्रसंगी झालेल्या प्रचार बैठकीत बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की गेल्या अडीच वर्षांत कराड दक्षिणमध्ये आलेल्या ७५० कोटींच्या विकासनिधीपैकी बहुतांश निधी हा रस्त्यांच्या कामासाठी आलेला आहे. या निधीतून गावागावातील जिल्हा मार्ग, पाणंद रस्ते, गटर बांधणी, पूल उभारणी अशी विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. गावगावात पेयजल योजना साकारण्यातही आपण मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालो आहोत. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व शेतकरी कल्याणाचे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतलेले आहेत. या निर्णयांच्या कायम अंमलबजावणीसाठी महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याची गरज आहे. कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटीबद्ध असून, या निवडणुकीत आपण मला भक्कम पाठबळ द्याल, याची मला खात्री आहे.

य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई म्हणाले, वडगाव हवेलीमध्ये प्रचार शुभारंभ सभेला झालेली गर्दीच या निवडणुकीचा निकाल सांगून जाते. लोकसभा निवडणुकीत डॉ. अतुलबाबांनी खासदार उदयनराजेंच्या रुपाने भाजपचा विजय खेचून आणला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुलबाबा विक्रमी मतांनी विजयी होतील, याची मला खात्री आहे.

यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक सयाजीराव यादव, अशोकराव गरुड, धनंजय गरुड, काशीनाथ गरुड, हणमंतराव गरुड, राहुल गरुड, संपतराव गरुड, दिलीपराव गरुड, बबनराव गरुड, रघुनाथराव गरुड, पूनम गरुड, उपसरपंच भीमराव देशमुख, राहुल पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close