“डॉ. अमोल पाटील यांचे जागतिक कीर्तीचे १२ पेटंट्स – संशोधन क्षेत्रात कराडचा झेंडा!”

कराड प्रतिनिधी, दि. ४ | चांगभलं वृत्तसेवा
यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल मोहन पाटील यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण १२ पेटंट्स प्राप्त करत संशोधन क्षेत्रात नवा कीर्तीमान प्रस्थापित केला आहे.
या उल्लेखनीय यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सांगितले की, डॉ. पाटील यांनी वनस्पतीशास्त्रातील एआय बेस्ड इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीजवर संशोधन करून इंडियन पेटंट्ससह एक जर्मन पेटंटही मिळवले आहे.
डॉ. पाटील यांनी तयार केलेली डिव्हायसेस ही आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि निसर्गशास्त्राचा उत्तम संगम दर्शवतात. या डिव्हायसेसमध्ये:
AI-Based Plant Drug Extraction Device
Smart Plant Health Monitoring Device
AI-Based Plant Virus Detection Device
AI-Based Plant Growth Detection Device
Portable Infectious Disease Detection Device
Nano Catalyst Drug Formulation Device
Bio-Electronic Plant Health Scanner
Portable Soil and Seed Analysis Device
Leaf Health Analyzing Portable Device
Self-Activating Symbiosis Booster
Non-Invasive Plant Root Scanner
Graphene-Based Air Filtration Device
Precision Farming AI-Robotic Device
A System for Synthesizing Asenomycins from Streptomyces for the Production of Antimicrobial Substances
यांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे.
या संशोधनात डॉ. पाटील यांना यशवंतराव मोहिते कॉलेज, पुणे येथील प्रा. डॉ. एस. जी. पवार, संस्थेचे जनरल सेक्रेटरी ए. एन. मुल्ला साहेब, अरुण पाटील काका, प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, तसेच प्रा. डॉ. जी. जी. पोतदार, डॉ. एस. ए. कीर्तने, आणि डॉ. भरत महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. पाटील यांचे आत्तापर्यंत ११ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध आणि ७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते मूळचे अंबक (चिंचणी), ता. कडेगाव, जि. सांगली येथील आहेत.
शिवाजी शिक्षण संस्था आणि महाविद्यालय स्तरावरून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
———————–
📰 “आपल्या गावाची, आपल्या मनातली बातमी – फक्त चांगभलं न्यूजवर!”
📲 खालील प्लॅटफॉर्मवर आम्हाला Follow / Subscribe करा: 📷 Instagram ▶️ YouTube 🐦 X
📘 Facebook 🗞️ Dailyhunt
❤️ Like करा ↗️ शेअर करा 🔔 रहा अपडेट