कराड पोलीस ठाण्याला बॅरिगेट्सचे ‘दिवाळी गिफ्ट’
शहा ग्रुपसह सॅटर्डे ट्रेकिंग ग्रुपचा उपक्रम, पोलीस उपअधिक्षक कार्यालयात वितरण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात उपेक्षितांसह गरजुंना मदतीचा आधार देणाऱ्या डिवाईन जैन ग्रुप आणि कॉसमॉस ग्रुपसह कराडच्या सॅटर्डे ट्रेकिंग ग्रुप यांच्या समन्वयातून कराडला शुक्रवारी लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आला. निवडणुक काळासह अनेक ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागणारे २० बॅरिगेट्स पोलीस उपअधिक्षक कार्यालयास वितरित करण्यात आले. या ग्रुपनी पोलीस प्रशासनाला केलेल्या सहकार्याचे उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी कौतूक करत समाजासाठी हे ग्रुप राबवत असलेले उपक्रम भुषणावह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
याप्रसंगी पुण्याच्या डिवाईन जैन ग्रुपचे संकेत शहा, कॉसमॉस ग्रुपचे मेहूल शहा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप सुर्यवंशी, देनिश शेठ, सॅटर्डे ट्रेकिंग ग्रुपचे भुषण शहा, मितुल शहा यांच्यासह कराडचे व्यावसायिक उपस्थित होते.
पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर म्हणाले, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे असो की वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणे किंवा निवडणुकांच्या, आंदोलनांच्या काळात पोलिसांना बॅरिंगेट्सची नेहमीच आवश्यकता भासते. डिवाईन जैन ग्रुप, कॉसमॉस ग्रुप, सॅटर्डे ट्रेकिंग ग्रुपनी चांगल्या प्रतीचे बॅरिगेट्स देऊन पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यांनी पुण्यासह महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी माणुसकी जपत जे उपक्रम राबवले आहेत ते पाहता त्यांचा उपेक्षितांना नेहमीच आधार ठरला आहे.
संकेत शहा, मेहूल शहा म्हणाले, डिवाईन जैन ग्रुप आणि कॉसमॉस ग्रुप हा पुण्यासह अनेक ठिकाणी गरजुंच्या मदतीला धावत असतो. जातीय, जिल्हयाच्या सिमा ओलांडून आम्ही हे कार्य करण्याचा प्रयत्न करतो. आज कराड उपविभागीय पोलिसांना बॅरिगेट्स दिले असून अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड परिसरातही सामाजिक उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
आभार मानताना राजू ताशिलदार म्हणाले, पोलीस आपले कर्तव्य बजावत असतातच पण समाजातून अशा प्रकारे सहकार्य आणि शाब्बासकी मिळाली की त्यांचे मनोबल आणखी उंचावते. समाज पोलिसांच्या पाठिशी आहे हे अशा प – कारच्या कृतीतून सिद्ध होते.