कराड तहसिल कार्यालयातून दर महिन्याला ‘इतक्या’ दाखल्यांचे वितरण ; साडेतीन महिन्यात उच्चांक

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सध्या 10 वी, 12 वी, पदवी व पद्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असले कारणाने कराड तालुक्यामध्ये विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचे सेतू सुविधा केंद्र व कराड तालुक्यातील 47 महा ई सेवा केंद्रामध्ये अर्ज प्राप्त झालेले होते. कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल्यांची आवक झालेली असलेने सदरचे दाखले वितरीत करणेचे काम हे आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत प्रांताधिकारी श्री. अतुल म्हेत्रे, तहसिलदार श्री. विजय पवार व संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोहिम स्वरुपात रात्रंदिवस दाखले तपासणीचे कामकाज करुन जास्तीत जास्त दाखले वितरीत केलेले आहे. महिना निहाय वितरीत केलेल्या दाखल्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
माहे मार्च 2024 मध्ये उत्पन्न दाखले 2061, रहिवास प्रमाणपत्र 57, डोमासाईल प्रमाणपत्र 1398, जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र 13, वारस प्रमाणपत्र 0, अल्प भूधारक 89, जात प्रमाणपत्र 543, नॉन क्रिमीलेयर 149, शेतकरी प्रमाणपत्र 0, 33 टक्के महिला प्रमाणपत्र 82, ई.डब्ल्यू. एस. (State) 81, ई.डब्ल्यू. एस. (Central) 22, उत्पन्न नॉन क्रिमीलेयरसाठी 234 असे एकूण 4726, माहे एप्रिल 2024 मध्ये उत्पन्न दाखले 2151, रहिवास प्रमाणपत्र 52, डोमासाईल प्रमाणपत्र 714, जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र 9, वारस प्रमाणपत्र 0, अल्प भूधारक 37, जात प्रमाणपत्र 508, नॉन क्रिमीलेयर 719, शेतकरी प्रमाणपत्र 1, 30 टक्के महिला प्रमाणपत्र 30, ई.डब्ल्यू. एस. (State) 24, ई.डब्ल्यू. एस. (Central) 116, उत्पन्न नॉन क्रिमीलेयरसाठी 1726 असे एकूण 6087, माहे मे 2024 मध्ये उत्पन्न दाखले 4845, रहिवास प्रमाणपत्र 58, डोमासाईल प्रमाणपत्र 1185, जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र 0, वारस प्रमाणपत्र 1, अल्प भूधारक 48, जात प्रमाणपत्र 133, नॉन क्रिमीलेयर 325, शेतकरी प्रमाणपत्र 3, 30 टक्के महिला प्रमाणपत्र 12, ई.डब्ल्यू. एस. (State) 36, ई.डब्ल्यू. एस. (Central) 211, उत्पन्न नॉन क्रिमीलेयरसाठी 1232 असे एकूण 8089, माहे जून 2024 मध्ये उत्पन्न दाखले 5374, रहिवास प्रमाणपत्र 38, डोमासाईल प्रमाणपत्र 1652, जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र 0, वारस प्रमाणपत्र 1, अल्प भूधारक 28, जात प्रमाणपत्र 27, नॉन क्रिमीलेयर 73, शेतकरी प्रमाणपत्र 2, 30 टक्के महिला प्रमाणपत्र 4, ई.डब्ल्यू. एस. (State) 7, ई.डब्ल्यू. एस. (Central) 130, उत्पन्न नॉन क्रिमीलेयरसाठी 1266 असे एकूण 8602, असे एकूण एकंदर 27504 इतक्या दाखल्यांचे वितरण करणेत आले. सदर दाखले वितरण केल्यामुळे संबंधित विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कराड तालुक्यातील विद्यार्थी, पालक तसेच विविध परीक्षेसाठी अर्ज भरणारे उमेदवार यांना कोणत्याही प्रकारच्या दाखल्यासाठी काही अडचण आल्यास त्यांनी श्री. बाबुराव राठोड, निवासी नायब तहसिलदार, कराड यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. अतुल म्हेत्रे यांनी केले.