धनगरवाडी उपसा सिंचन योजनेचे टप्पा क्र. १ योजनेची स्थापत्य कामे अंतिम टप्प्यात – changbhalanews
राज्य

धनगरवाडी उपसा सिंचन योजनेचे टप्पा क्र. १ योजनेची स्थापत्य कामे अंतिम टप्प्यात

- सातारा पाटबंधारे प्रकल्पाची माहिती

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
धनगरवाडी उपसा सिंचन योजनेचे टप्पा क्र. १ ची योजनेची स्थापत्य कामे अंतिम टप्प्यात असुन विद्युत विभागाकडून बसडक्ट चे काम प्रगतीपथावर आहे. विद्युत वाहिनी रेल्वे क्रॉसिंगचे कामास या आठवाड्यात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे तसेच हेळगाव व कालगाव येथील कळयंत्र आवाराचे काम विद्युत विभागाकडुन जुन-२०२४ अखेर पुर्ण करण्याचे नियोजित आहे. यांत्रिकी विभागाकडून पंप व पॅनेल पुरवठा पूर्ण असुन बसविणेचे काम तसेच जलाघात उपकरण बसविणेचे काम जुन-२०२४ अखेर पुर्ण करण्याचे नियोजित आहे, अशी माहिती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सहा. अधीक्षक अभियंता सं.ग. माने यांनी दिली आहे.

सदर योजनेचा टप्पा क्र. १ मधील वितरण व्यवस्थेचे काम ९०% पुर्ण असून सदर टप्पा कार्यान्वित करण्यासाठी वनविभागाच्या हद्दितील वितरण हौदाचे काम करण्यास वनविभागाची मंजुरी मागील आठवड्यात मिळाली आहे. सदरचे काम प्रगतीपथावर आहे. टप्पा क्र. १ चे स्थापत्य, यांत्रीकी व विद्युत काम सप्टेंबर २०२४ अखेर पुर्ण करणेचे नियोजित आहे.

सदर योजनेच्या टप्पा क्र. २ मधील वितरण व्यवस्थेचे काम ८५% पुर्ण असुन सदर टप्पा कार्यान्वित करण्यासाठी वनविभागाच्या हहितील गायकवाडवाडी, घोलपवाडी, निगडी, पाडळी व गोसावेवाडी येथील पाईपलाईनचे काम करण्यास वनविभागाची मंजुरी मागील आठवड्यात मिळाली आहे. सदरचे काम प्रगतीपथावर आहे. सदर टप्प्यातील पंपगृह क्र. २ चे काम पुर्ण करण्यास ०.६९ हे. जमीन खाजगी वाटाघाटीने संपादीत करण्यासाठीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कराड यांचेकडून मागील आठवड्यात सादर करणेत आले आहे. सदरचे प्रस्ताव मंजुर होताच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन टप्पा क्र. २ चे काम पुर्ण करुन डिसेंबर २०२४ अखेर सिंचन क्षमता निर्मितीचे नियोजन आहे, असेही सह. अधीक्षक अभियंता श्री. माने यांनी कळविले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close