रायगड जिल्ह्यातील धनगर समाज आजही सुविधांपासून वंचित राज्यकर्त्यांनी समाजाचा केला फक्त वापर – प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे – changbhalanews
राज्य

रायगड जिल्ह्यातील धनगर समाज आजही सुविधांपासून वंचित राज्यकर्त्यांनी समाजाचा केला फक्त वापर – प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे

चांगभलं ऑनलाइन | रायगड

कोकण आणि रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून राज्यकर्त्यांनी फक्त समाजाचा मतदाना पुरता वापर केला असून समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला आहे

ते खालापूर (गोळेवाडी ) येथील जनजागृती मेळाव्यात बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रविण काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

काकडे म्हणाले, ऑल इंडिया धनागर समाजाच्या माध्यमातून युवकांना एकत्र करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही संघटना अहोरात्र मेहनत घेत असून समाजातील मुले-मुली शिकल्या तर समाजाची शैक्षणिक प्रगतीबरोबर आर्थिक प्रगती होईल.

कोकणासह रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत तालुक्यातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यांवर आजही रस्ता वीज आणि पाण्याची सोय नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून एकीकडे ७५ वर्ष पूर्ण झाल्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे परंतु आमच्या समाजाचा आजही विकास झाला नसून आमचा समाज शिक्षणापासून वंचित आहे. तर ७५ वर्षापासून धनगर आरक्षणाचा प्रश्न आजही तसाच असून राज्यकर्त्यांनी फक्त धनगर समाजाचा निवडणुकीपुरता वापर केला असून लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असल्याने समाजाने आतातरी शहाणे होऊन समाजाचा जो कोणी उमेदवार ‌असेल. त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. जेणेकरून राजकीय पक्षाला आपल्या समाजाची ताकद कळून ते आपली दखल घेतील, असे आवाहन ही प्रवीण काकडे यांनी केले.

यावेळी ऑल इंडिया धनगर महासंघ कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे, महाराष्ट्र राज्य सचिव अरुणा वावरे, रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश उघडे, उपाध्यक्ष सुनील कोकळे, डॉ. राजाराम हुलवान, मारुती गोरड, अनंता हिरवे, माजी अध्यक्ष आनंदराव कचरे, रामचंद्र पुकळे, ओमकार कुचेकर, कळंबोली शहर अध्यक्ष अरुणा दडस, माजी सरपंच खालापूर तालुका अध्यक्ष किरण हिरवे , महादेव कारंडे, नथुराम ढेबे, बाळकृष्ण आखाडे, विठ्ठल जांगळे, नरेश आखाडे, गणेश बावदाने, मंगेश बावदाने, प्रकाश बुरगले, सतीश बंडगर, आशिष स्वामी, प्रफुल्ल जंगम, रामदास महानवर, अण्णासाहेब वावरे, संजयकुमार गोरड, सुरेश घाटे, महादेव घाटे आदिंसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close