देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी तर डॉ. अतुलबाबा भोसले यांची मंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी कराड भाजपकडून रत्नेश्वराला अभिषेक घालून साकडं – changbhalanews
राजकिय

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी तर डॉ. अतुलबाबा भोसले यांची मंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी कराड भाजपकडून रत्नेश्वराला अभिषेक घालून साकडं

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आणि कराड दक्षिणचे नवनिर्वाचित जायंट किलर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी कराड मधील कृष्णामाई घाट परिसर येथील श्री रत्नेश्र्वर मंदिरात भाजपा कराड शहरच्यावतीने शहराध्यक्ष एकनाथ बागडी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते , महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रत्नेश्वराला अभिषेक करून साकडं घातलं.

यावेळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद शिंदे, अनुसूचित जिल्हाउपाध्यक्ष सागर लादे, शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे, रुपेश मुळे, मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते, संजय शहा, प्रितेश मेहता, केतन शहा, विशाल कुलकर्णी, सौरभ शहा, अनिल पवार, सोपान तावरे, पल्लवी तावरे, राहुल आवटी, सौरभ शहा, राजेंद्र खोत,ज्ञमंजिरी कुलकर्णी, धनश्री रोकडे, कविता माने, स्वाती मोहिते, दैवशीला मोहिते, सुमन बागडी, राजश्री कारंडे, रोहिणी साळवी, चेतन थोरवडे, नितीन भोसले, तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी हजर होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
WhatsApp Group