चांगभलं ऑनलाइन | मुंबई
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा व्हिडीओ तयार करून आरोपींकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला देण्यात आली आहे.
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून सलमान खानला सातत्याने धमकावण्यात येत आहे. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. यापूर्वी 14 एप्रिलला सलमान खान याच्या मुंबई येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. या घटनेची बॉलीवूडमध्ये मोठी चर्चा झाली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आरोपींनी एक व्हिडिओ करून सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून युट्युब वर एक व्हिडिओ अपलोड करून ही धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी राजस्थान येथून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. बनवारीलाल गुजर वय 25 असे संशयित आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याला सातत्याने धमक्या मिळत असल्याने चाहत्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.