आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघात ४७ कामांसाठी आणला ४ कोटी ५२ लाख रुपयेचा निधी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विकास दूत व मिस्टर क्लीन म्हणून देशात लौकिक ठरलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा गेल्या दहा वर्षात चेहरामोहरा बदलला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात १८०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी आणला होता. विकासाचा सिलसिला व त्यांची विकासाची दृष्टी अद्यापही तशीच असून, त्यांनी नुकताच मतदारसंघातील ४७ विकासकामांना ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी आणून आपल्या कृतिशील व्यक्तिमत्वाची ओळख आणखी घट्ट केली आहे. या निधीमध्ये रेठरे बुद्रुक या प्रमुख गावासह कृष्णा काठावरील गावांमधील कामांसाठी सव्वा कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गतवर्षी राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाकडे कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती अंतर्गत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. या समितीने राज्यात ४७ कोटी रुपयांचा निधीस नुकतीच तांत्रिक मंजुरी दिली. यामधून प्रत्येक तालुक्यासाठी १० टक्के निधीप्रमाणे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवलेल्या ४७ कामांना ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून सुमारे ४२ गावातील मूलभूत सुविधा व शैक्षणिक कार्याला बळकटी मिळणार आहे.
भूकंप पुनर्वसन निधीतून मंजूर झालेली कामे, गावे व कंसात मंजूर रक्कम पुढीलप्रमाणे : आकाईचीवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (पाच लाख रुपये), आटके येथील प्रजिमा रस्ता जोडणाऱ्या कोळे पाणंद रस्ता मुरुमीकरण करणे (दहा लाख रुपये), आणे येथे आणे गावठाण ते आणे – येणके पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (आठ लाख रुपये), कापील येथील हनुमान वॉर्डातील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), कार्वे येथील दोन ठिकाणच्या अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (वीस लाख रुपये), कालवडे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), काले येथील जुजारवाडी बंधारा ते काले – मालखेड ग्रामीण मार्गापासून रस्ता मुरुमीकरण, खडीकरण व डांबरीकरण या कामासाठी (आठ लाख रुपये)
संजयनगर (काले) येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), कासारशिरंबे येथील खंडोबा मंदिर ते वसंत माने यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (आठ लाख रुपये), किरपे येथील शिवाजी माने यांच्या घरापासून मारुती देसाई यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), कुसुर येथील कुसुर स्टँड ते शेष वस्तीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (आठ लाख रुपये), कोडोली येथील दिलीप जगताप यांची वस्ती ते शंकर जगताप यांच्या वस्तीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), शेणोली येथील रोहिणी दिलीप पाटील यांच्या घरापासून गाव ओढ्यापर्यंतच्या रस्त्यालगत गटार बांधणीसाठी (चौदा लाख रुपये)
कोळे येथील शेख बोजगर दफनभूमी रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), कोळेवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (आठ लाख रुपये), खुबी येथील नागनाथ पाणंद रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणेसाठी (सात लाख रुपये), खोडशी येथील हायवेपासून ग्रामपंचायतीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), गवारकरवाडी (येळगाव) येथे सामाजिक सभागृह बांधणे (बारा लाख रुपये), गोटे येथील भादी मदरसा ते नवीन पाणीपुरवठा विहिरीपर्यंतचा पाणंद रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे (सात लाख रुपये), गोटे येथील शंकर पवार यांचे घर ते विनायक थोरात यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (सात लाख रुपये), गोटेवाडी येथील महेंद्र आमले ते बाळासाहेब सुपनेकर, आनंदा रानमाळे ते संदीप रानमाळे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे (आठ लाख रुपये)
गोळेश्वर येथील शंभू महादेवनगर येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), घारेवाडी येथील जुनी घारेवाडी ते नवीन घारेवाडी रस्ता डांबरीकरण करणे (सात लाख रुपये), घोगाव येथील अंतर्गत रस्ता सुधारणा करणेसाठी (दहा लाख रुपये), चचेगाव येथील कमानीपासून उत्तम पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), जखिणवाडी येथील अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), जिंती येथील अधिक पाटील यांचे घर ते एकनाथ नांगरे – पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), जुळेवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे (दहा लाख रुपये), दुशेरे येथील वडगाव हवेली हद्दीजवळ शिव पाणंद रस्ता शिवाजी मारुती जाधव यांच्या शेतापासून माणिक जगन्नाथ जाधव यांच्या शेतापर्यंतचा रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे (दहा लाख रुपये), धोंडेवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), नांदलापूर येथील अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), पोतले येथील पाटील मळ्यात एक शाळा खोली बांधण्यासाठी (बारा लाख रुपये)
भुरभूशी येथील पाटील गल्लीतील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (सात लाख रुपये), मनव येथील ग्रामपंचायत ते पाण्याच्या विहिरीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (सात लाख रुपये), मलकापूर येथील आनंदा पवार यांच्या घरापासून श्री. भस्मे यांच्या कोपऱ्यापर्यंत काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), मलकापूर येथील शास्त्रीनगरमधील हौसाई कन्या शाळेच्या पश्चिम बाजूकडील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), मुनावळे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (पाच लाख रुपये), येणपे येथील तानाजी जाधव यांच्या घरापासून दत्त मंदिर तळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (आठ लाख रुपये), येरवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक खोली बांधण्यासाठी (बारा लाख रुपये), येळगाव येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), रेठरे खुर्द येथील सतीश नलवडे यांच्या गॅरेजपासून मांड नदीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मुरुमीकरण व खडीकरण करणे (सात लाख रुपये), रेठरे बुद्रुक येथील मारुती मंदिर ते विलास पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे (वीस लाख रुपये), वाठार येथील दगडी चाळ ते लक्ष्मी मंदिरपर्यंतच्या २०० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (वीस लाख रुपये), विंग येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), साळशिरंबे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (सात लाख रुपये), सैदापूर येथील एसजीएम कॉलेजच्या पाठीमागील गुरु दत्तनगर मधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये) आदी कामांचा समावेश आहे.
सदरचा निधी आणताना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी रेठरे बुद्रुक येथील विकासकामासाठी वीस लाख रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. राजकीय हेतूने कोणताही दुजाभाव न करता विकासाची प्रक्रिया राबविण्यात आ. चव्हाण पारंगत आहेत, याची प्रचिती यातून होते. याआधी पृथ्वीराजबाबांनी रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पुल बांधणीसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. हे काम सद्या गतीने सुरू आहे. तर जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपये उपलब्ध केले होते. ते काम पूर्ण होवून बऱ्याच कालावधीसाठी वाहतुकीस बंद असलेला पुल सुरू झाला. विकासाच्या कार्यात आ. पृथ्वीराज चव्हाण कधीच संकुचित विचार ठेवत नाहीत. असा अनुभव त्यांच्या या प्रत्यक्ष कृतीतून येतो, हे नक्की.