सातारा जिल्ह्यात पारध्यांच्या पालावर भाऊबीज साजरी !
पारधी मुक्ती आंदोलनाचा उपक्रम

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पारधी मुक्ती आंदोलनाचेवतीने सालाबाद प्रमाणे पारध्यांच्या पालावर भाऊबीज हा भावनिक उपक्रम यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कराडसह सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पारधी भगिनींना साडी, दिपावली फराळ तसेच लहान मुलाचे कपड्यांचे वाटप समाजातील विविध स्तरांमध्ये काम करणारे मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे , कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के , उद्योजक सतीश फाळके , पारधी मुक्ती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, प्रा .दीपक म्होप्रेकर, दलित महासंघाचे जयवंत सकटे, अनिल लोंढे, प्रा. सचिन झिंमरे, शाहू वायदंडे, तात्या पवार, अल्ताफ काळे , गोरख काळे यांचेसह मोठ्या संख्येने पारधी बांधव उपस्थित होते.
२००५ सालापासून उपक्रम….
पारधी मुक्ती आंदोलनाचे माध्यमातून २००५ सालापासून पारध्यांच्या पालावर भाऊबीज हा भावनिक व स्नेहाचा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमात प्रशासन व पोलीस यंत्रणेतील अधिकारी तसेच समाजातील मोठ्या मनाची माणसं सहभागी होतात व सहकार्य करतात.