आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून मंजूर झालेल्या बेलवडे बुद्रुक येथील विकासकामांचे भूमिपूजन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या बुद्रुक तालुका कराड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी सकाळी राष्ट्रीय काँग्रेस सेवादल विभागाचे कराड दक्षिण अध्यक्ष व पाटण तालुका प्रभारी शिवाजीराव मोहिते यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून बेलवडे बुद्रुक गावातील बेलवडे-कासारशिरंबे रस्ता ते विजय पाटील यांचे घर या दरम्यानच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
दरम्यान, बेलवडे बुद्रुक येथील बेलवडे-कासारशिरंबे रस्ता ते वाटेगाव रस्ता यादरम्यान काँक्रिटीकरण कामासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाची भूमिपूजन ही मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून व कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी सेवादल काँग्रेसचे कराड दक्षिण अध्यक्ष व पाटण तालुका प्रभारी शिवाजीराव मोहिते, आनंदराव मोहिते, ग्रामपंचायत सदस्य जयवंतराव मोहिते, किरण मोहिते, माणिकराव मोहिते, विकास पवार, संजय पवार, भगवान मोहिते, मारुती मोहिते, हेमंत मोहिते, नामदेव मोहिते, संजय तडाके, झाकीर मुल्ला, बबन धोत्रे, दत्तप्रसाद शिंदे, संभाजी मोहिते (शेटजी), आबासाहेब मोहिते सर, दिलीप सकटे, विकास मोहिते, विक्रमसिंह मोहिते, तानाजी मोहिते, पराग माने, मानसिंग मोहिते, वसंत मोहिते, शामराव मंडले , रामचंद्र कुंभार, आनंदा मंडले , अधिकराव मोहिते, शिवाजी पवार, अंकुश मोहिते, संभाजी मोहिते, महादेव मोहिते, हंबीरराव मोहिते सर, जगन्नाथ मोहिते सर, अर्जुन मोहिते, भास्कर मोहिते, बाबासो धोत्रे, तुकाराम जाधव, उदय डबल, संतोष मोहिते , तानाजी मोहिते, शहाजी माने, धनाजी माने, प्रकाश माने, अनिकेत भोसले, संदीप मोहिते, बाळासाहेब भोसले, विजय जाधव, सागर डुबल, सुरज मोहिते, दत्ता कुंभार हणमंत मोहिते, विकास काळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विजय पाटील व संजय मोहिते यांच्यासह बेलवडे बुद्रुक गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.