चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना २०२३ – २४ मधून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ८ कोटी ७० लाख ६९ हजार इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आ. चव्हाण यांनी मतदरसंघातील
समतोल राखला आहे. अशी माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.
प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हंटले आहे की, केंद्रीय पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री, राज्यसभा व लोकसभेचे खासदार असल्यापासून सातारा आणि कराड परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना हजारो कोटी रुपयांचा निधी आणत मतदारसंघाचा कायापालट केला.
गेली नऊ वर्षे आ. चव्हाण कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या नऊ वर्षातही त्यांनी विकासाची प्रक्रिया निरंतर चालू ठेवली आहे. जिल्हा नियोजन समितीकडे चालू आर्थिक वर्षात आ. चव्हाण यांनी विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार मतदारसंघात मंजूर झालेली विकासकामे व कंसात मंजूर निधी पुढीलप्रमाणे ; नागरी सुविधा 2023-24 अंतर्गत वडगाव हवेली येथे १५ लाख रुपये,
कार्वे (१० लाख). डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत आणे (१२ लाख), भरेवाडी (५ लाख), लटकेवाडी (५ लाख), शेवाळेवाडी – येवती (१० लाख), राज्य विद्युत वितरण कंपनीकडून येरवळे (८ लाख ८८ हजार), विंग (८ लाख १७ हजार), पोतले (१२ लाख ४९ हजार), कार्वे (२ लाख ६० हजार), कार्वे (१ लाख ७५ हजार) कोळे (५ लाख २१ हजार)
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे दुरुस्ती 2023-24 अंतर्गत कापील (५ लाख), कोडोली (५ लाख), कार्वे (५ लाख), अंगणवाडी इमारत दुरुस्ती 2023-24 अंतर्गत काले – 83 (१ लाख), काले – 84 (१ लाख), खुबी – 110 (१ लाख), येणपे – 321 (१ लाख), शेवाळवाडी – 49 (१ लाख), टाळगाव नवीनसाठी (१ लाख), काजारवाडी – मिनी (१ लाख), माटेकरवाडी – 161 (१ लाख), बांदेकरवाडी – 15 (१ लाख), म्हासोली – 163 (१ लाख), शेवाळवाडी – येवती (१ लाख), शेवाळवाडी – म्हासोली (१ लाख), घराळवाडी – 50 (१ लाख), काटेकरवाडी 106 (१ लाख), जनसुविधा 2023-24 अंतर्गत वारुंजी (७ लाख), गोटे (७ लाख), मुंढे (७ लाख), घारेवाडी (७ लाख), आणे (७ लाख), येरवळे (७ लाख), संजयनगर – शेरे (७ लाख), रेठरे बुद्रुक (७ लाख), रेठरे खुर्द (७ लाख)
नारायणवाडी (७ लाख), जुजारवाडी (७ लाख), शिंदेवाडी – विंग (७ लाख), नांदगाव (६ लाख)
3054 सन 2023-24 अंतर्गत रेठरे खुर्द (२० लाख), वारुंजी (३५ लाख), घराळवाडी (२० लाख), घोगाव (२५ लाख), कासारशिरंबे (२० लाख), मुळीकवाडी – गोटेवाडी (२० लाख), 5054 सन 2023-24 अंतर्गत वहागाव – घोणशी – कोपर्डे हवेली – पार्ले बनवडी रस्ता सुधारणा करणे (५० लाख), येवती – घराळवाडी – मस्करवाडी – चव्हाणवाडी – धामणी – डाकेवाडी – निवी रस्ता ते कराड हद्द सुधारणा करणे (४० लाख)
क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत आटके (१० लाख), विशेष घटक साकव कार्यक्रम अंतर्गत कोळे (३९ लाख १७ हजार), सर्वसाधारण साकव कार्यक्रम अंतर्गत बांदेकरवाडी – सवादे (५९ लाख ७२ हजार) जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्ती अंतर्गत म्हासोली (३ लाख), कोळे (३ लाख), जिल्हा परिषद नवीन शाळा खोली बांधणे अंतर्गत मंजूर कामे गोटे (११ लाख ८२ हजार), वहागाव (११ लाख ८२ हजार)
साठवण बंधारा बांधणे अंतर्गत सवादे (५० लाख ५८ हजार), तुळसण – सवादे (४६ लाख ७० हजार), सवादे – गट नं. 273 (३३ लाख ६४ हजार), सवादे – शेरी (३९ लाख ४६ हजार), सवादे येथे साठवण बंधारा (२० लाख ८ हजार), पवारवाडी – नांदगांव (२७ लाख १४ हजार), स्मार्ट आरोग्य केंद्र, कोळे (७० लाख) अशा आठ कोटी ७० लाख ६९ हजार रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
आत्तापर्यंत दोन हजार कोटींचा निधी…..
नुकताच आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड विमानतळासाठी २२१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कराड शहरालगत चौपदरी रस्त्यांचे जाळे, भूकंप संशोधन केंद्र, आरटीओ ऑफिस या लक्षवेधी कामांच्या माध्यमातून आ. चव्हाण यांनी सुमारे २ हजार कोटी पर्यंतचा निधी आणला आहे. तर नुकताच विमानतळासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कराडच्या विकासासाठी आणखी उपयुक्त ठरणार आहे, हे नक्की!