चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे 61 कर्मचारी पुन्हा कामावर घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे. नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महामंडळाच्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत.
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी व्यवस्थापकीय संचालकांनी तडकीफडकी कामावरून काढले होते. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी नरेंद्र पाटील यांनी त्यांची भेट घेतली. या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने ते 61 कर्मचारी पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत, अशीच माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा घेण्याच्या आदेश दिल्याने महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांच्या वादावर पडदा पडला आहे.