कराड तालुक्यातील ‘या’ गावात साखळी उपोषण – changbhalanews
Uncategorized

कराड तालुक्यातील ‘या’ गावात साखळी उपोषण

मराठा आरक्षणासाठी तरूण एकवटले

चांगभलं | कराड प्रतिनिधी

राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, या मागणी करिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून सातारा जिल्हातील शेणोली मंडल विभागातील सर्व गावांच्यावतीने शेणोली येथे बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. वृद्धांच्या बरोबरच या आंदोलनात तरुणांचा मोठा पुढाकार आहे.

याआंदोलनामध्ये शेणोली गावासह सह मंडल विभागातील गोंदी, शेरे,थोरात मळा,खुबी, जुळेवाडी , रेठरे बु.,दुशेरे, कोडोली, संजय नगर, शेणोली स्टेशन, वडगाव हवेली या गावातील मराठा समाज बांधव, गणेश मंडळे, तरुण मंडळे यांसह शेकडो कार्यकर्ते दररोज या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.

मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशानुसार जोपर्यंत शासन मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत, हे उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे.

सूचना – या बातमीचा व्हिडिओ तुम्ही ‘ Changbhala news’ या YouTube channel वर पाहू शकता.

 

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close