बेलवडे बुद्रुकमध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास प्रारंभ
देवराज पाटील यांच्यासह बौद्ध व इतर समाजांचा पाठिंबा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने बेलवडे बुद्रुक ता. कराड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी बौद्ध बांधव, ओबीसी बांधव यांनी उपस्थित राहून सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी व मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बेलवडे बुद्रुक येथील सकल मराठा समाजाकडून बुधवार, दि. 6 डिसेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी नारायण वाॅर्ड, किरण मोहिते मित्र परिवाराच्यावतीने साखळी उपोषण करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे गावातील नवबौद्ध तरुण मंडळच्यावतीने पुजन करण्यात आले.त्यानंतर साखळी उपोषणाला सुरूवात झाली. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज दादा पाटिल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या साखळी उपोषणाला पाठींबा जाहीर केला. यावेळी गावातील सकल मराठा समाज, बौद्ध , मांतग, धनगर, कुंभार, सुतार, कोळी, रामोशी, लोहार , मुस्लिम इतरही समाजाचे बांधव उपस्थित होते.
साखळी उपोषणाचे नियोजन असे…
गुरुवार व शुक्रवार दिनांक 07/08 रोजी शिवतेज गणेश मंडळ,
शनिवार व रविवार दिनांक09/ 10 रोजी शिवगर्जन मंडळ, श्री राम मंडळ, सोमवार व मंगळवर दिनांक 11/12 रोजी श्नी शिवाजी गणेश मंडळ, बुधवार व गुरुवार दिनांक13/14 रोजी
जय हनुमान गणेश मंडळ , शुक्रवार व शनिवार दिनांक 15/ 16
रोजी नवचैतन्य गणेश मंडळ, रविवार व सोमवार दिनांक 17/18 रोजी नागराज गणेश मंडळ, मंगळवार व बुधवार दिनांक 19/20
रोजी सर्व महीला बचत गट, तसेच गुरुवार दिनांक 21 रोजी समस्त सकल मराठा समाज, शुक्रवार व शनीवार दिनांक 22/ 23 रोजी वारकरी भजनी मंडळ यांचा साखळी उपोषणात सहभाग राहणार आहे.