ब्रह्मदास विद्यालयात शिक्षक दिन साजरा ; विद्यार्थी बनले शिक्षक

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कासेगाव शिक्षण संस्थेच्या बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ब्रह्मदास विद्यालयामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून १९६२ पासून देशभर साजरा केला जातो. शिक्षक हा शिल्पकार क्षमाशील व कलाकार असतो, शिक्षक नेहमीच एखाद्या शिल्पकारा प्रमाणे विद्यार्थी रुपी शिल्प घडवत असताना तो क्षमाशीलतेचे दर्शन घडवत असतो. एखाद्या कलाकारा प्रमाणे तो विद्यार्थ्यांची ज्ञानरूपी मूर्ती घडवत असतो , असे मनोगत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. वाय. माने यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांचे विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यतः समुदायांमध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सवांचा समावेश हा दिवस असू शकतो. १९ व्या शतकापासून देशांमध्ये शिक्षक दिन हा साजरा केला जातो , असे प्रतिपादन विद्यालयाच्या सहा शिक्षिका सुवर्णा जाधव यांनी केले.
एन. डी. महापुरे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यालयातील इयत्ता नववीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारून शिक्षक दिन साजरा केला व विद्यालयातील सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी विद्यालयातील सहा. शिक्षक पी. टी. पाटील सर यांचा आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक एस. वाय. माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी बनले शिक्षक…
यावेळी विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी शर्मिली शशिकांत मोहिते ही मुख्याध्यापकपदी तर कार्याध्यक्षपदी विद्यार्थीनी ऐश्वर्या साळुंखे होती. यावेळी शर्मीली मोहिते हिने आपल्या मनोगत मधून शिक्षक दिन साजरा केल्याबद्दल व विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी दिल्याबद्दल विद्यालयाचे आभार मानले.
यावेळी कार्याध्यक्ष जे. बी. माने, उप कार्याध्यक्ष ए. जे. खांडेकर , पी. टी. पाटील, जी. व्ही. रणदिवे, जी. ए. मोरे, एन. डी. महापुरे , व्ही. पी. मोठ, एन. के. माळी, एस. डी. वाबळे, सहा शिक्षिका एस. एस. जाधव, व्ही. आर. अत्तार, ज्योती मोहिते, जयवंत साळुंखे, शशिकांत मंडलिक, शिवाजी कोळी, भगवान मोहिते, अंकुश मोहिते उपस्थित होते.