टेंभू बंधाऱ्याच्या अॅन्टीव्हॅक्युम वॉलमधील पितळी बुश चोरी करणारा गजाआड
कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टेंभु ता.कराड येथुन धरणावरुन चोरीस गेलेले अॅन्टीव्हॅक्युम वॉल मधील पितळी बुश चोरट्याकडून जप्त करून त्याला गजाआड केले. बापुराव रघुनाथ मदने वय 36 रा. टेंभु ता. कराड जि.सातारा असे संशयीताचे नाव आहे.
पोलिसांकडील माहिती अशी, दिनाकं 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता ते दिनाक 15 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 या कालावधीत टेंभु ता. कराड गावचे हद्दीतून टेंभु टप्पा 1 अ व 1 ब येथील पाण्याचा पाईप क्र. 1 ते 6 वर एकुण 12 अँन्टीव्हॅक्युम वॉल मधील पितळी बुश एकुण 12 नग वॉल एकुण 72 हजार रुपये किंमतीचे खोलुन काढुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. याबाबत दिपक श्रीरंग गवारे व्यवसाय-नोकरी रा. गजानन हाँसिग सोसायटी विटा रोड ता.कराड जि.सातारा यांनी अज्ञात चोरटयाविरुध्द फिर्याद दिली होती.आहे.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर , पोलीस निरीक्षक के. एन. पाटील (अतिरीक्त कार्यभार) कराड तालुका पोलीस ठाणे यांचे सुचनेनुसार कराड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, सज्जन जगताप, नितीन येळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन संशयीत आरोपी बापुराव रघुनाथ मदने वय 36 रा. टेंभु ता. कराड जि.सातारा यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यामध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून या चोरीतील 4 अँन्टीव्हॅक्युम वॉल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल एचएफ डिलक्स क्रमांक MH 50 A 9513 असा एकूण 78 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात संशयितास शुक्रवार दि. 19 जानेवारीला अटक करून पोलिसांनी न्यायालयास उभे केले असता त्याला दि. 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. सदर गुन्ह्याचा तपास हवालदार उत्तम कोळी करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील (अतिरीक्त कार्यभार) कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी.एस. कांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, सज्जन जगताप, नितीन येळवे यांनी केली आहे.