ब्रह्मदास महिला पतसंस्थेचा पावणे पाच कोटींचा एकूण व्यवसाय ; वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
: – ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., बेलवडे बुद्रुक या संस्थेच्या ब्रह्मदास महिला पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन सौ. उज्वला वसंतराव मोहिते होत्या. यावेळी व्हाईस चेअरमन सौ. उषा मोहिते यांच्यासह सर्व संचालिका उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना चेअरमन सौ. उज्वला मोहिते म्हणाल्या, ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेसोबतच संस्थेच्या महिला पतसंस्थेचीही यशस्वी वाटचाल सुरू आहे. वीस वर्षांत संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला असून, कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेने संस्थेचे कामकाज उत्कृष्टरित्या सुरू आहे. संस्थेने सभासदांना वेळोवेळी कर्जपुरवठा केला असून, सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी यापुढेही संस्थेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अहवाल वाचन करत संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना व्यवस्थापिका सौ. स्वाती मोहिते म्हणाल्या, महिला पतसंस्थेच्या एकूण ठेवी २ कोटी ६९ लाख रुपयांच्या आहेत. संस्थेने १ कोटी ९७ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले असून, संस्थेत २ लाख ७९ हजारांचा नफा झाला आहे. तर संस्थेने ४ कोटी ६७ लाखांचा एकत्रित व्यवसाय केला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लार्क विश्वास शेवाळे यांनी केले. व्हाईस चेअरमन सौ. उषा मोहिते यांनी आभार मानले. सभेस सभासद, कर्मचारी उपस्थित होते.