भाजपची लोकसभा निवडणुकीच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ मतदारसंघातून लढणार! महाराष्ट्रातील ‘या’ ज्येष्ठ नेत्याला उत्तर प्रदेशात उमेदवारी
चांगभलं ऑनलाइन | नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा या यादीमध्ये करण्यात आली आहे. सिने अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ही यादी पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी घोषित केली आहे.
195 उमेदवारांच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री असलेल्या 34 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. यादीत 28 महिलांच्या नावांचा समावेश असून एक लोकसभा अध्यक्ष आणि दोन माजी मुख्यमंत्री यांचीही नावे समाविष्ट आहेत. या यादीमध्ये अनुसूचित जाती 27, अनुसूचित जमाती 18 तर ओबीसी 57 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली समावेश नाही मात्र, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेले आणि सध्याचे ज्येष्ठ भाजप नेते असलेल्या कृपाशंकर सिंह यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील जौनपुर मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.
पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेली राज्ये व उमेदवार संख्या पुढील प्रमाणे – (BJP Lok Sabha Candidates First List) – उत्तर प्रदेश- ५१, पश्चिम बंगाल – २०, मध्य प्रदेश – २४, गुजरात – १५, राजस्थान – १५, केरळ – १२, तेलंगणा – ९, आसाम – ११ (एकूण जागा १४), झारखंड – ११, छत्तीसगड – ११, दिल्ली – ५, जम्मू – काश्मीर – २, उत्तराखंड – ३, अरुणचाल प्रदेश – २, गोवा – १, त्रिपुरा – १, अंदमान निकोबार – १, दीव आणि दमण – १
We're set to announce candidates on 51 seats from Uttar Pradesh, 20 from West Bengal, 24 from Madhya Pradesh, 15 each from Gujarat and Rajasthan, 12 from Kerala, 9 seats from Telangana, 11 from Assam, 11 each from Jharkhand and Chhattisgarh, 5 from Delhi, 2 from J&K, 3 from… pic.twitter.com/hUa5jyOjng
— BJP (@BJP4India) March 2, 2024
भाजपने जाहीर केलेली यादी व मतदारसंघनिहाय उमेदवार याप्रमाणे – उत्तर प्रदेश – वाराणसी: पीएम नरेंद्र मोदी, कैराना: प्रदीप कुमार, मुजफ्फरनगर: डॉ. संजीव कुमार बालियान, नगीना: औम कुमार, रामपूरः घनश्याम लोधी, संभल. परमेचर सैनी, अम्मरोहा: बेत्वर सिंह तंवर, नोएडा: डॉ. महेश शर्मा, बुलंदशहर: भोला सिंह, मथुराः हेमा मालिनी, आद्याः सत्यपाल सिंह बघेल, फतेहपुर सिक्री-राजकुमार बाहर, एटा: राजवीर सिंह राजू भैया, आंचलाः धर्मेंद्र कश्यप, शाहजहांपुर, अरुण कुमार सागर, खीरी: अजय मिश्रा टेनी, धौहराः रेखा वर्मा, सौलापूरः राजेशा वर्मा, हरदोई: जय प्रकाश रावत, मिश्रिखः अशोक कुमार रावत, उजाय: साक्षी महाराज, मोहनलालगंज: कौशल किशोर, लखनऊ: राजनाथ सिंह, अमेठी: स्मृती इराणी, प्रतापगढ़ः संगमलाल गुप्ता, फर्रुखाबादः मुकेश राजपुत, इटावा: राम शंकर कठेरिया, कन्नौज: सुब्रत पाठक, अकबरपुरः देवेंद्र सिंह भोले, जालौनः भानू प्रताप सिंह, झांसी अनुराग शर्मा, हमीरपुरः कुंवर पुष्ाँद सिंह चंदेल, बांदा: आरके सिंह पटेल, फतेहपूरः साध्वी निरंजन ज्योती, बाराबंकी : उपेंद्र रावत, फैजाबाद: लल्लू सिंह, आंबेडकर नगरः रितेश पांडे, डुमरियागंज : जगदंबिका पाल
गाँडा, कीतींवर्धन राजा भैया, बस्ती: अरविंद द्विवेदी, महाराजगंज: पन्त चौधरी, मौस्खपुरः रवि किशन, कुशीनगरः विजय कुमार दुबे, बासगांव: कमलेश पासवान, लालगंज, श्रीमती नीलम सोनकर, आजमगढ़ः दिनेश लाल पांदण निरहुआ,
सलेमपुरः रवींद्र कुसवाह, जौनपुर: कृपा शंकर सिंह, चंदौली महेंद्र नाथ पांडेय,
दिल्ली – चांदनी चौकः प्रवीण खंडेलवाल, उत्तर-पूर्व दिल्ली: मनोज तिवारी, नई दिल्ली: बासुरी स्वराक, पश्चिम दिल्ली: कमलजीत सहरावत, दक्षिण दिल्ली: रामवीर सिंह विडी
मध्य प्रदेश – मुरैना: शिवमंगल सिंह तोमर, भिः नंबर राप,
नयाल्देरः भरत सिंह कुशव, मुनाः ज्योतिरादित्य सिंधिया, सागरः लता वानखेडे, दमोहः राहुत लोधी, खजुराहो: वीडी शर्मा,
सतनाः गणेश सिंह, देवासः मर्दद्र सिंह सील, मंदसोर सुधीर गुप्ता, रतलामः अनिता नगर सिंह चौहान, खरगौनः गजेंद्र पटेल, खंडवा ज्ञानेश्वर पाटील, बैतूल दुर्गादास उईके,
अंदमान आणि निकोबार बेटे – अंदमान आणि निकोबार बेटे; विष्णू पद रे,
अरुणाचल प्रदेश – अरणागल पश्चिम : किरण रिजिजू ,
अरुणाचल पूर्व: तापित गाको ,
आसाम – करीमगंज : कुयानाच मल्लाह, सिलचरः परिमत सुकताबैध, स्वायत जिल्हा : अमर सिंह तिम्सो, गुवाहाटी: बिजुली कलिता मेधी, मंगलदोई: दिलीप सैकिल्या, तेजपूरः रणजीत दत्ता, नागावः सुरेश बोरा, कालिपाबीरः कामाख्या प्रसाद तासा, कोरहाटः टोपन कुमार गोगोई, दिब्रुगढ़ः सर्बानंद सोनोवाल, लखीमपुर, प्रधान बरूजা
29 फरवरी, 2024 को प्रधानमंत्री श्री @narendramodi की गरिमामयी उपस्थिति और श्री @JPNadda की अध्यक्षता में आयोजित केंद्रीय चुनाव समिति की बैठक में आगामी लोकसभा चुनाव हेतु 195 लोकसभा सीटों के लिए बीजेपी उम्मीदवार के नामों पर मंजूरी दी गई। (4/4) pic.twitter.com/EcvaQvcXnz
— BJP (@BJP4India) March 2, 2024
छत्तीसगड – सरगुजाः चिंतामणी महाराज, रायगडः राधेश्याम रपिया, जांजगीर-पंपाः कमलेश जांगडे, कोरबा: सरोज पांडे, बिलासपूरः तोखन साहू, राजनांदगामः संतोष पांडे, दुर्ग: विजय बचेल, रायपूर: ब्रिजमोहन अवान, महासमूदः रूप कुमारी चौधरी
, बलर महेश कल्य, कांकेर भोजराज नाग.
दादर व नगर हवेली तसेच दीव आणि दमण – दमण आणि दीव लालुभाई पटेल, गोवा- उत्तर गोवा श्रीपाद योस्सो नाईक.