कृष्णा आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवाच्या मंडपाचे भूमिपूजन उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्यावतीने कराड येथे दि. १७ ते २१ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदर्शनस्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करुन, मंडप उभारणीस प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, निवासराव थोरात, वसंतराव शिंदे, दत्तात्रय देसाई, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जितेंद्र पाटील, श्रीरंग देसाई, धोंडीराम जाधव, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, आर. टी. स्वामी, जिल्हा कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे, ‘आत्मा’ संस्थेचे प्रकल्प प्रमुख दिग्वीजय बंडगर, तहसीलदार श्री. चंद्रा, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे म्हणाल्या, हा कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल. याठिकाणी शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषीतंत्रज्ञानाची माहिती मिळणार असल्याने, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट द्यावी. याठिकाणी पी.एम. किसान योजनेची प्रत्यक्ष नोंदणी करण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार असून, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, तहसीलदार श्री. चंद्रा यांनीही मनोगत व्यक्त केले. शुअरशॉट इव्हेंटस्चे संदीप गिड्डे यांनी प्रदर्शनात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. गजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. पोपट देसाई यांनी सूत्रसंचालन केले. अमोल गुरव यांनी आभार मानले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष बंडा डुबल, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, माजी नगरसेवक हणमंतराव जाधव, महादेव पवार, सुहास जगताप, राजू मुल्ला, शिवाजीराव थोरात, कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील, माजी संचालक ब्रिजराज मोहिते, सुजित मोरे, उमेश शिंदे, धनाजी जाधव, ॲड. विजयकुमार पाटील, मोहनराव जाधव, मुकुंद चरेगावकर, घन:श्याम पेंढारकर, दत्तात्रय पाटील, प्रमोद पाटील, हर्षवर्धन मोहिते, हेमंत पाटील, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, राजेंद्र शहा, डॉ. सारिका गावडे, बंटी जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.