45 सातारा लोकसभा मतदार संघात सरासरी 63.16 टक्के मतदान
सर्वाधिक कोरेगावला 67.59 टक्के तर सर्वात कमी पाटणला 56.95 टक्के मतदान
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
45 सातारा लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी शांततेत व सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियमध्ये वृद्ध, तरुणांनी, नवमतदार, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान 257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान 261- पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
यामध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे. 256 वाई मतदारसंघात 1 लाख 71 हजार 755 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 11 हजार 183 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. या मतदार संघात 1 लाख 69 हजार 953 स्त्री मतदारांपैकी 96 हजार 691 मतदारांनी मतदान केले. तर इतर 6 मतदारांपैकी 4 मतदारांनी मतदान केले. अशा एकूण 3 लाख 41 हजार 714 मतदारांपैकी 2 लाख 7 हजार 878 मतदारांनी मतदान केले. यामध्ये टक्केवारी निहाय पुरुष 64.73 टक्के, स्त्रीया 56.89 टक्के, इतर 66.67 टक्के असे एकूण 60.83 टक्के मतदान झाले.
257 कोरेगाव मतदारसंघात 1 लाख 59 हजार 656 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 11 हजार 901 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. या मतदार संघात 1 लाख 53 हजार 525 स्त्री मतदारांपैकी 99 हजार 779 मतदारांनी मतदान केले. तर इतर 2 मतदारांपैकी कोणीही मतदान केले नाही. एकूण 3 लाख 13 हजार 183 मतदारांपैकी 2 लाख 11 हजार 680 मतदान केले. यामध्ये टक्केवारी निहाय पुरुष 70.09 टक्के, स्त्रीया 64.99 टक्के असे एकूण 67.59 टक्के मतदान झाले.
259 कराड उत्तर मतदारसंघात 1 लाख 51 हजार 511 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 2 हजार 507 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. या मतदार संघात 1 लाख 45 हजार 427 स्त्री मतदारांपैकी 91 हजार 520 मतदारांनी मतदान केले. तर इतर 7 मतदारांपैकी 2 मतदारांनी मतदान केले. एकूण 2 लाख 96 हजार 945 मतदारांपैकी 1 लाख 94 हजार 29 मतदारांनी मतदान केले. यामध्ये टक्केवारी निहाय पुरुष 67.66 टक्के, स्त्रीया 62.93 टक्के, इतर 28.57 टक्के असे एकूण 65.34 टक्के मतदान झाले.
260 कराड दक्षिण मतदारसंघात 1 लाख 54 हजार 666 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 3 हजार 965 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. या मतदार संघात 1 लाख 47 हजार 887 स्त्री मतदारांपैकी 94 हजार 663 मतदारांनी मतदान केले. तर इतर 27 मतदारांपैकी 5 मतदारांनी मतदान केले. एकूण 3 लाख 2 हजार 580 मतदारांपैकी 1 लाख 98 हजार 633 मतदारांनी मतदान केले. यामध्ये टक्केवारी निहाय पुरुष 67.22 टक्के, स्त्रीया 64.01 टक्के, इतर 18.52 टक्के असे एकूण 65.65 टक्के मतदान झाले.
261 पाटण मतदारसंघात 1 लाख 52 हजार 468 पुरुष मतदारांपैकी 84 हजार 250 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. या मतदार संघात 1 लाख 47 हजार 97 स्त्री मतदारांपैकी 86 हजार 365 मतदारांनी मतदान केले. तर इतर 2 मतदारांपैकी 1 मतदारांनी मतदान केले. एकूण 2 लाख 99 हजार 567 मतदारांपैकी 1 लाख 70 हजार 616 मतदारांनी मतदान केले. यामध्ये टक्केवारी निहाय पुरुष 55.26 टक्के, स्त्रीया 58.71 टक्के, इतर 50 टक्के असे एकूण 56.95 टक्के मतदान झाले.
262 सातारा मतदारसंघात 1 लाख 68 हजार 961 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 9 हजार 340 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. या मतदार संघात 1 लाख 66 हजार 758 स्त्री मतदारांपैकी 1 लाख 1 हजार 306 मतदारांनी मतदान केले. तर इतर 32 मतदारांपैकी 10 मतदारांनी मतदान केले. एकूण 3 लाख 35 हजार 751 मतदारांपैकी 2 लाख 10 हजार 656 मतदारांनी मतदान केले. यामध्ये टक्केवारी निहाय पुरुष 64.71 टक्के, स्त्रीया 60.75 टक्के, इतर 31.25 टक्के असे एकूण 62.74 टक्के मतदान झाले.
45- सातारा लोकसभा मतदार संघात असे एकूण 9 लाख 59 हजार 17 पुरुष मतदारांपैकी 6 लाख 23 हजार 146 मतदारांनी, 9 लाख 30 हजार 647 स्त्री मतदारांपैकी 5 लाख 70 हजार 324 मतदारांनी ,76 इतर मतदारांपैकी 22 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये टक्केवारी निहाय पुरुष 64.98 टक्के, स्त्रीया 61.28 टक्के, इतर 28.95 टक्के असे एकूण 63.16 टक्के मतदान झाले.
संपूर्ण जिल्हा प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अहोरात्र झोकून प्रयत्न केल्याने व त्यास 45- सातारा लोकसभा मतदार संघातील मतदारांनी चांगली साथ दिल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदारांनी शांततेत, कायदा व सुव्यवस्था राखत मतदानाची प्रक्रिया पार पाडल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्वांचे आभार मानले.