मुंबई : क्रीडा प्रतिनिधी
एशियन गेम्स अंतर्गत झालेल्या भारत आणि नेपाळ यांच्यातील क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. नेपाळने पहिले दोन सामने जिंकत उपांत्य फेरीमध्ये धडक मारली होती. मात्र भारताविरूद्धच्या सामन्यामध्ये नेपाळ संघाचा 23 धावांनी पराभव झाला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना नेपाळसमोर 203 धावांचं आव्हान ठेवलं. भारताकडून यशस्वी जयस्वाल याने धडाकेबाज शतकी धावांची खेळी केली. नेपाळ संघाला 20 ओव्हर्समध्ये 179 (9) धावाच करता आल्या. या विजयामुळे ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे.
भारतीय संघ : रुतुराज गायकवाड (C), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश शर्मा (W), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग.
नेपाळ संघ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (W), संदीप जोरा, गुलसन झा, रोहित पौडेल (C), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहरा, संदीप लामिछाने.