चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहर पोलिसांच्या डीबी पथकाने दोन मोटर सायकल चोराच्या मुसक्या आवळत एकुण 6 मोटर सायकली जप्त करुन 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कराड शहरातील मोटर सायकल चोरीबाबत विशेष लक्ष देवुन तात्काळ गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याचे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांचे नेतृत्वाखाली कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक आर. एल. डांगे यांच्या पथकाने कौशल्यं पुर्ण तपासाचे जोरावर तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराचे मदतीने दोन संशयीत इसमांना नागठाणे येथून ताब्यात घेतले. त्यातील एक जण हा सातारा जिल्यातील तडीपार व दुसरा सराईत मोटर सायकल चोरटा होता. त्यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागातुन चोरी झालेल्या मोटर सायकल चोरीचे सहा गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
संशयित जय अशोक सांळुखे रा. नागठाणे ता. जि. सातारा व अषिश बन्सीराम साळुंखे रा. नागठाणे ता. जि. सातारा यांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याकडुन एकुण 2 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या एकुण 6 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डांगे, सहा. फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार. शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे.
4 महिन्यात 22 दुचाकींचा शोध, 9 आरोपींना बेड्या
पोलीस उपनिरीक्षक आर.एल.डांगे यांनी कराड डीबीचा पदभार घेतले पासुन वपोनि प्रदिप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक डांगे व त्यांच्या डीबी पथकाने अवघ्या 4 महिन्यात एकुण 22 दुचाकींचा शोध घेवुन सांगली, सातारा जिल्ह्यातील 9 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.