राज्यपाल रमेश बैस यांचे सातारा जिल्ह्यात आगमन – changbhalanews
राज्य

राज्यपाल रमेश बैस यांचे सातारा जिल्ह्यात आगमन

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले स्वागत

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
राज्यपाल रमेश बैस यांचे आज (मंगळवारी) सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुंडी यांनी पुष्पगुच्छ देवून प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी६ वा. आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रामबाई बैस यांचेही आगमन झाले. याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल श्री. बैस यांचे स्वागत केले. राज्यपाल महोदय हे शनिवार दि. 25 मे 2024 पर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close