पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची वार्षिक सभा उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सातारा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याध्यक्ष श्री बाजीराव देशमुख यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
यानिमित्ताने सैनिक फेडरेशनचा प्रतिनिधी सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कदम यांनी सैनिक फेडरेशन जिल्ह्यामध्ये प्रशासनाबरोबर समन्वय साधत सैनिकांचे व त्याच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत असल्याचे सांगून प्रशासनातील, शासनातील परिपत्रक व त्यांची माहिती दिली. सर्व सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनांनी एकत्र येऊन सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन सैनिक फेडरेशनवतीने कदम यांनी केले.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, अॅड विनीत पाटील, महाराष्ट्र राज्य पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना राज्य सल्लागार विलासराव घाडगे, सातारा जिल्हाध्यक्ष नवनाथ इंदलकर, कार्याध्यक्ष धनाजी फडतरे, मुख्य सल्लागार दयानंद अनपट, सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. कराड तालुका सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सदाशिव नागणे, चिखली माजी सैनिक संघटनेचे राजाराम माळी, भीमराव सावंत तसेच सर्व माजी सैनिक, महीला, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.