मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब, कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकमधून जगन्नाथ अभ्यंकर, नाशिक शिक्षकमधून किशोर दराडे विजयी – changbhalanews
राजकियराज्य

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब, कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकमधून जगन्नाथ अभ्यंकर, नाशिक शिक्षकमधून किशोर दराडे विजयी

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)
2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772
3) योगेश बालकदास गजभिये :- 89
4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39
5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष :- 11
6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464
7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष :- 26
8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37
पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲङ अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे विजयी

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
1) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719
2) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस :- 28 हजार 585
3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना :- 536
4) अमोल अनंत पवार, अपक्ष :- 200
5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310
6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302
7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष :- 424
8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64
9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215
10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33
11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष :- 208
12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष :- 334
13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष :- 141
पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विजयी

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती 26 हजार 476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 32 हजार 309 मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये 19 व्या बाद फेरीनंतर श्री. संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी  31 हजार 576  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. 19 व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसरा फेरी अखेर 17 हजार 393 मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची 6 हजार 72 मते पडली.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close