आनंदा पाटील यांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर – changbhalanews
Uncategorized

आनंदा पाटील यांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर

सातारा जिल्ह्यास वीस वर्षांनंतर बहुमान

  • कराड | प्रतिनिधी
    कराड तालुक्यातील नांदगावचे सुपुत्र आनंदा रघुनाथ पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्यावतीने नुकताच गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे. कामगार राज्यमंत्री सुरेश खाडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. दरम्यान, तब्बल वीस वर्षानंतर सातारा जिल्ह्यास हा बहुमान प्राप्त झाला आहे.
    या पुरस्काराचे वितरण २६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे समारंभपूर्वक होणार आहे. तब्बल २० वर्षांनी सातारा जिल्ह्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह नांदगाव येथील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, पत्रकार प्रमोद सुकरे, पत्रकार हैबतराव आडके आदींसह ग्रामस्थांनी आनंदा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close