सातारा जिल्ह्यातील ‘या’ ग्रंथालयाला सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा एक लाखाचा पुरस्कार तर सातारा शहर व सांगली जिल्ह्यातील दोघांना 25 हजाराचा शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर
चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन 2022-23 या वर्षीचे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे, यासाठी तसेच ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात येते. याअंतर्गत सन 2022-23 या वर्षासाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.
(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार
शहरी विभाग
१) हिंद नगर वाचनालय व ग्रंथालय, रहिमतपूर ता. कोरेगाव, जि. सातारा ( पुरस्काराची रक्कम रु. १ लाख)
२) विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, नांदुरा, श्री. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, बुलढाणा रोड, नांदुरा जि. बुलढाणा (पुरस्काराची रक्कम रु. ७५ हजार)
ग्रामीण विभाग :
(अ) १) शहीद भगतसिंग वाचनालय, कुऱ्हा, मु.पो. कुऱ्हा ता. तिवसा जि. अमरावती (पुरस्काराची रक्कम १ लाख रु.)
(आ) संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, भिडी ता. देवळी जि. वर्धा (७५ हजार रु.)
(इ) कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय, बोरी, ता. जिंतूर जि. परभणी (५० हजार रुपये)
(ई) कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालय, बिरोबा मंदिराजवळ, कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर ( २५ हजार रु.)
(ब) डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. ५० हजार प्रत्येकी)
राज्यस्तरीय पुरस्कार
१) राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)
श्री. विनायक दत्तात्रय गोखले, अनंत आनंद को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आनंद पार्क, ठाणे (प) मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे
२) राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)
श्री. सुरेश बळीराम जोशी, ग्रंथपाल, विजय वाचनालय, ता. तुळजापूर जि. धाराशिव
डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. २५ हजार प्रत्येकी) :
१) अमरावती – श्री. विनोद बाळकृष्ण मुंदे, श्री. सरस्वती सार्वजनिक वाचनालय, राजना पो. काजना ता. नांदगाव खंडे, जि. अमरावती
२) छत्रपती संभाजीनगर – श्री. युवराज मोहनराव जाधव, लोकमान्य सार्वजनिक वाचनालय, शिवणी (खुर्द), पो. शिवणी (बु.). ता.जि. लातूर
३) नागपूर – श्री. धनराज देवीलाल रहांगडाले, श्री. शारदा वाचनालय, गोंदिया जि. गोंदिया
४) नाशिक – श्री. गोपीचंद जगन्नाथ पगारे, मातृभूमी प्रबोधन समिती संचलित महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, जेल रोड, नाशिक जि. नाशिक
५) पुणे – श्रीमती ज्योत्स्ना चंद्रशेखर कोल्हटकर, श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, भवानी पेठ, सातारा जि. सातारा
६) मुंबई – श्री. अनंत आपाजी वैद्य, रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
डॉ. एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. २५ हजार प्रत्येकी) :
१) अमरावती – श्रीमती ज्योती रामदास सरदार (धबाले), ग्रंथपाल, साने गुरुजी वाचनालय, जठार पेठ, अकोला, जि. अकोला
२) छत्रपती संभाजीनगर – श्री. गणेश रामभाऊ शेंडगे, ग्रंथपाल, ए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालय, ता. जि. बीड
३) नागपूर – श्री. नंदू दामोदर बनसोड, ग्रंथपाल, दादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालय, महाल, ता.जि. नागपूर
४) नाशिक – श्री. अमोल संभाजी इथापे, ग्रंथपाल अहमदनगर जिल्हा वाचनालय, चितळे रोड, अहमदनगर जि. अहमदनगर
५) पुणे – श्री. भगवान पांडुरंग शेवडे, ग्रंथपाल श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मांगले, ता.शिराळा, जि. सांगली
६) मुंबई – श्रीमती मंजिरी अनिल वैद्य, ग्रंथपाल, श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालय, विलेपार्ले (पूर्व) मुंबई.