काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘या’ नेत्यांचा समावेश
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी राज्यात सर्वत्र सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षानेही नुकतीच आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तीन नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण , अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, नसीम खान, अमित देशमुख, नितीन राऊत, वसंत पुरके, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम , कुमार केतकर, भालचंद्र मुणगेकर, कन्हैया कुमार आदींना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे.
या यादीत सातारा जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सांगली जिल्ह्यातील आमदार विश्वजीत कदम, कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील या स्टार प्रचारक नेत्यांचा समावेश आहे.