ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने राज्यभरातील ९० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान – changbhalanews
राज्य

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने राज्यभरातील ९० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रेरणादायी ठरेल – रामहरी रुपनवर यांचे प्रतिपादन

पुणे | चांगभलं वृत्तसेवा
पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये पार पडलेल्या त्रिशताब्दी जयंती कार्यक्रमात, अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या वतीने राज्यभरातील ९० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही. धर्म, समाज, राज्यकारभार आणि शांतता राखणं या साऱ्यांत त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे.”

महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणा देणारा पुरस्कार…

कार्यक्रमात डॉ. नितीन वाघमोडे (आयकर आयुक्त, पुणे), डॉ. प्रा. महेश थोरवे (संचालक, एमआयटी इन्स्टिट्यूशन, पुणे), बाळासाहेब कर्णवर पाटील (चेअरमन, श्री सद्गुरु साखर कारखाना), श्री दीपक राहीज (उद्योगपती), श्री महेश इनामदार (रिजन हेड्स, सॅटर्डे क्लब ट्रस्ट, पुणे) यांनी आपली मते मांडली.
तसेच, प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण काकडे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ) व सुनील शेंडगे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), बाळासाहेब झोरे, राजू दुर्गे (माजी नगरसेवक, पिंपरी चिंचवड), अशोकराव पवार (ज्येष्ठ समाजसेवक, मुंबई), शेषराव शेंडगे (चेअरमन, स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था, कोल्हापूर), मुकुंद कुचेकर (ज्येष्ठ समाजसेवक, पिंपरी चिंचवड) यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक व आभार….
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रवीण काकडे (संस्थापक अध्यक्ष, अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट) यांनी केले. आभार प्रा. महावीर काळे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम…

प्रा. शितल काकडे, नथुराम डोईफोडे (राजगड), बाबुराव शेडगे (मावळ), सुनील शेंडगे (पुणे), दिनेश शिंदे (भोर), वसंतराव हिरवे (बारामती), अशोकराव शिंदे (विश्रांतवाडी), हरिभाऊ लबडे (भोसरी), इंद्रजित ताटे, अजित ताटे (वारजे) यांनी कार्यरत भूमिका निभावली.
विशेष उपस्थिती :
एम.डी. दडस, संजय नायकवडी, संजय कवितके, सोमनाथ देवकाते, शंकर दाते, संतोष पांढरे, अरुणा गडस, भाऊसाहेब आखाडे, नानासाहेब मरगळे, तुकाराम कोकरे, नवल राजकाळे, सोमनाथ ओव्हाळ, संदीप शेंडगे, प्रशांत शेंडगे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कराड येथे झाला होता १४६ महिलांचा गौरव…
पुण्यातील कार्यक्रमापूर्वी, कराड येथेही त्रिशताब्दी जयंतीनिमित्त १४६ महिलांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा महिला गौरव सोहळा असल्याचे रामहरी रुपनवर यांनी नमूद केले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close