कराड उत्तरमध्ये शाही युथ फाऊंडेशनकडून सर्व रोगनिदान शिबिर
गरजू विद्यार्थ्यांना सायकल व शालेय वस्तूंचे वाटप
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आज इस्लाम धर्माचे संस्थापक शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर (सल्ल लावोअले हवसल्लम) यांची जयंती म्हणून मसूर ता. कराड येथील शाही युथ फाऊंडेशन यांच्यावतीने हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने यावर्षी सर्व रोगनिदान शिबीर व गरजू विद्यार्थ्यांना सायकल व शालेय वस्तूंचे वाटप पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना झाकीर पठाण म्हणाले, ईद-ए-मिलाद आज संपूर्ण जगभरामध्ये प्रेषित मोहम्मद यांचा जन्मोत्सव साजरा होत असताना हजरत मोहम्मद पैगंबर यांना समजून घेणे हे फार महत्त्वाचे आहे. एक ईश्वर वादाचा पुरस्कार त्यांनी केला. हजरत मोहम्मद पैगंबर हे स्वतः निरक्षर होते. परंतु त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यानंतर देवाज्ञा झाली आणि त्यांच्या मुखातून कुराण वर्तवलं गेलं आणि आज ते कुराण जसं आहे तसं आत्मसात करण्याचा प्रयत्न प्रत्येक मुस्लिम अनुयायी करत असतात. पवित्र कुराणांमध्ये न्यायशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे, सामाजिक आहे, त्याचप्रमाणे अर्थशास्त्र , वैद्यकीयशास्त्र आहे अशा सर्व शास्त्रांचा अंतर्भाव त्यामध्ये केलेला आहे. पवित्र कुराणाचं वाचन आणि त्याचं आचरण करणे हे प्रत्येक मुस्लिम अनुयायी यांचे परम कर्तव्य आहे. पैगंबरानी आणि पाच तत्व मुस्लिम धर्मियांना दिली आणि शिकवणी पेक्षा आचरण हा सर्वात मोठा सिद्धांत पैगंबर यांनी सर्व अनुयायी यांना दिला. संपूर्ण जगभरामध्ये मुस्लिम धर्माची शिकवण पोहोचली आहे .
पैगंबरांच्या बाबतीत अनेक तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञांनी, थोर नेत्यांनी अभ्यास केला. आज-काल जगभरामध्ये त्यांच्या तत्वाबद्दल चिकित्सा होत असते. अरबी भाषेमधील हे शब्द आहे, त्यामध्ये खास करून ‘जिहाद’ या शब्दाबद्दल फार मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे . परंतु अन्यायाविरुद्ध अनितीविरुद्ध लढणे म्हणजे जिहाद … स्त्रियांना पुरुषाबरोबर समान संधी देणारा पहिला तत्त्ववेत्ता पैगंबर मोहम्मद.. गुलामाला देखील मानवाप्रमाणे जगता यावे म्हणून गुलामगिरी नष्ट करणारा समतेचा समानतेचा संदेश देणारा पहिला तत्ववेत्ता पैगंबर महंमद…उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला देखील माहित नाही झाले पाहिजे असं तत्व ठेवणारा पैगंबर मोहम्मद….. प्रत्येक मुस्लिम धर्मियांना कायमस्वरूपी बंधनकारक जकात हे तत्व आपल्या संपत्ती मधून स्वतः जकात आकारणी करून गोरगरिबांना द्यावी असा कायमस्वरूपी संदेश दिलेला पैगंबर मोहम्मद….. दानधर्माला उच्च स्थान देणारा पैगंबर मोहम्मद ….लॉ अँड ऑर्डर बाबतीत अत्यंत कठोर असा शर्रीयत कायदा त्यांनी निर्माण केला की ज्यामुळे चोरी, डकैती, बलात्कार, खून अशा गंभीर घटनांच्या बाबतीत तितकीच गंभीर शिक्षा लागू केलेला पैगंबर मोहम्मद… जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे याची आचार संहिता ज्यांनी दिली ते पैगंबर मोहम्मद… जगाला शांतीचा संदेश देणारे पैगंबर मोहम्मद…इस्लामचा दुसरा अर्थ अमन आहे या दिवशी गोरगरिबांना दानधर्म करून अन्नदान करून नमाज पठण करून हजरत महंमद पैगंबर यांचे नामस्मरण करून हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत असतो. या दिवशी अनेक शहरांमध्ये जुलूस निघतो, विधायक काम घडते आणि पैगंबर यांचा जयघोष होतो. आज ईद-ए-मिलाद हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आपल्यातील बंधुप्रेम असंच अखंडित राहो. या देशांमध्ये शांती कायम राहो. या देशाची समृद्धी व भरभराटी कायम राहो. या देशाचे नागरिक म्हणून जगत असताना सर्व धर्मगुरु व साधुसंतांचे संस्कार आणि या सर्वधर्म संस्थापकांचा आदरभाव सर्वांच्या मनी कायम राहो हीच सदिच्छा, असे महत्वपूर्ण विचार झाकिर पठाण यांनी मांडले.
या वेळी कराड उतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, सुदाम दीक्षित, विजय जगदाळे, शफीक शेख, कादर पिराजादे, संजय शिरातोडे, युनूसभाई मुल्ला, राजू इनामदार, सोहेल मुल्ला, मुक्तार मुल्ला, मोहसिन बेपारी, मूबिन बागवान, अकीब पटेल व ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.