पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त नवी मुंबईत १४० महिलांचा सन्मान

मुंबई , दि. १२ | चांगभलं वृत्तसेवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासात तोड नाही. अहिल्यादेवी या मानवतेच्या समतेच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांचे कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते. छत्रपती शिवरायांच्या नंतर तेवढ्याच तोलामोलाच राज्य करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहासात गौरव आहे. देशातील पहिली सैनिकी महिलांची शाळा सुरू करण्याचा मानही त्यांनाच जातो. अशा या अहिल्यादेवींच्या कर्तृत्वास तोड नाही, असे प्रतिपादन माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले.
नवी मुंबई येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त रविवारी (दि. ७) आयोजित महिला सन्मान सोहळ्यात १४० महिलांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रामहरी रुपनवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वासराव मोटे, कृगर व्हेंटिलेशन कंपनीचे जनरल मॅनेजर संपतराव शेडगे, म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी शंकरराव विरकर व ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर सोमनाथ कर्णवर उपस्थित होते.
या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा महिला पुरस्कार सोहळा पार पडला. महिलांना ऊर्जा व प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मा. प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांचा गौरव शक्य झाला.
यावेळी विश्वासराव मोटे (मुंबई महानगरपालिका उपायुक्त), बी.डी. मोटे (ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय सचिव), मा. मनीष लाबोर (गोवा प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), सोमनाथ कर्णवर (पोलीस इन्स्पेक्टर ठाणे), अशोकराव मोटे (उद्योगपती मुंबई), संजय वाघमोडे (वनविभाग अधिकारी), बाळासाहेब पुकळे (कुर्ला बँक संचालक) यांची भाषणे झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उल्हासराव वाघमोडे (भूमी अभिलेख अधिकारी), नितीन विरकर (सिडको अधिकारी), सचिन बुरुंगले (हर्ष लॉजिस्टिक कंपनी चेअरमन), प्रकाश पारटे, अक्षय जानकर, आदित्य वाघमोडे, दयानंद ताटे, रामचंद्र पोकळे, आनंदराव कचरे, अक्षय चोपडे, शिवाजीराव दातीर, जगन्नाथ काकडे, शरद काकडे, नितीन काकडे, अभिषेक शिंदे, अण्णासाहेब वावरे, नानासाहेब वाघमोडे, शंकरराव कोळेकर, मिलिंद मोटे, लक्ष्मण गोरड, विकास जानकर, प्रमेश झंजे, भास्कर यमगर, नयन सिद, नानासाहेब मगदूम, राजाराम गोरे, संजय गोरड, पिराजी गोरड, मारुती गोरड, ओंकार कुचेकर, राजाराम हुलवान, वामन भानुसे, शहाजी पाटील, नवनाथ बिडगर आदींनी प्रामाणिक प्रयत्न केले.