आक्रमक यशवंत विकास आघाडीचा इशारा टाळे ठोकू…काळे फासू
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड नगर परिषदेतील लोकनियुक्त बॉडीची मुदत सव्वादोन वर्षापूर्वी संपली. गेल्या दोन-सव्वादोन वर्षात कराड नगर परिषदेत प्रशासकीय कारभार सुरु आहे, या कालावधीत विविध विभागातील अधिकान्यांवर अंकुश ठेवणारी व्यवस्था नसल्यामुळे अधिका-यांची बेदरकार वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत गेली. अधिकात्यांच्या बेफिकीर व मनमानी कारभाराचा सर्वसामान्य कराडकरांना त्रास व्हायला लागला व आजही होत आहे, वेळेल कामे न करणे, पुर्णवेळ जागेवर नसणे, प्रचंड प्रमाणात पैशाची मागणी करणे, यामुळे कराडकर नागरीक हैराण झाले आहेत. अशा मुजोर अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अन्यथा पालिकेस टाळे ठोकू आणि अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशारा यशवंत विकास आघाडीच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिला आहे.
यानिमित्त पत्रकार परिषदेत राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराडकर नागरीकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच मनस्तापा बाबत यशवंत विकास आघाडीने आक्रमक भुमिका घेतली असुन आंदोलन करणे, नगर परिषदेला टाळे लावणे हाच पर्याय निवडला असुन या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना कराडकरांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देणार आहोत.
नगर परिषदेतील उर्मट व बेदरकार अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी होणे आवश्यक आहे, अशी मागणी नगर परिषदेच्या प्रशासकांना करण्यात आली असुन त्यांनी तातडीने संबंधीत अधिकानऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा नगर परिषदेला टाळे लावण्यात येईत. तसेच संबंधीत अधिकाऱ्यांविरूध्द तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यशवंत विकास आघाडीच्यावतीने माझी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्याकडून देण्यात आला आहे.
29 मे पर्यंत बदल्या करा, अन्यथा टाळे ठोकू, काळे फासू…
दरम्यान, कराडकर नागरिकांना मनस्ताप देणाऱ्या मुजोर टी.पी. विभागातील अधिकात्यांच्या बुधवार दि.२९ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वाजेपर्यंत बदल्या होणे आवश्यक आहे, अन्यथा आघाडीच्यावतीने समस्त नागरीकांना बरोबर घेवुन नगर परिषदेला टाळे लावण्यात येईल. तसेच संबंधीत अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा यशवंत विकास आघाडीच्यावतीने राजेंद्रसिंह यादव यांच्याकडून देण्यात आला आहे.