यशवंत विकास आघाडीकडून मंत्री शंभूराज देसाई यांचे कराडला जोरदार स्वागत

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई प्रथमच पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, तत्पूर्वी कराड येथे पाटण तिकाटणे येथे शिवसेना यशवंत विकास आघाडी व कराड नगरीच्यावतीने भव्य जल्लोषी स्वागत मंत्री शंभूराज यांचे करण्यात आले. यावेळी जेसीबीच्या साह्याने मंत्री शंभूराज यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच जोरदार फटाके फोडण्यात आले.
आजपर्यंत कराड शहराच्या विकासासाठी भरघोस निधी शंभूराज देसाई यांनी दिला आहे. तसेच इथून पुढच्या काळात सुद्धा कराड शहराला ते भरीव सहकार्य करतील, अशी अपेक्षा कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी व्यक्त केली. यावेळी विजयसिंह यादव, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, बाळासाहेब यादव, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, राहुल खराडे , ओंकार मुळे, निशांत ढेकळे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, राजेंद्र माने, सुलोचना पवार, गुलाबराव पाटील, सुधीर एकांडे, जयंत गुजर, सचिन पाटील, संजय थोरात, बापू देसाई, संतोष अवघडे, प्रमोद पवार, विनोद शिंदे तसेच राजेंद्रसिह यादव व विजयसिंह यादव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.