आपली संस्कृतीशैक्षणिक
आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, विटा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘वस्त्र-भाषा अलग, परंतु दिल है हिंदुस्तानी’ संकल्पनेवर भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

विटा | चांगभलं वृत्तसेवा
आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, विटा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त “वस्त्र-भाषा अलग, परंतु दिल है हिंदुस्तानी – वन नेशन, वन हार्ट” या संकल्पनेवर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ही संकल्पना प्राचार्य डॉ. एन. एस. महाजन यांच्या कल्पनेतून साकारली गेली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भारतातील विविध राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान केले व स्थानिक भाषा सादर करून ‘एकतेतूनच खरी ताकद’ हा संदेश दिला.
भारताच्या विविधतेतील एकतेला उजाळा देणारे हे सादरीकरण सर्वांना भावले. देशभक्तीपर गीते व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.