कराडच्या स्मशानभूमीत दहनासाठी घातलेले वेळेचे बंधन रद्द करा – changbhalanews
Uncategorized

कराडच्या स्मशानभूमीत दहनासाठी घातलेले वेळेचे बंधन रद्द करा

लोकशाही आघाडीची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

कराड नगरपरिषदेने, वैकुंठ स्मशानभूमी कराड येथे दहनासाठी घातलेल्या वेळेच्या बंधना विरोधात, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही आघाडी कराड शहर यांच्यावतीने, अध्यक्ष जयवंत पांडुरंग पाटील यांनी लोकशाही आघाडीच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिकांसमवेत मुख्याधिकारी, कराड नगरपरिषद कराड यांना लेखी निवेदन देऊन स्मशानभूमीत दहनासाठी घातलेले वेळेचे बंधन रद्द करण्याची मागणी केली आहे.

प्रारंभी कराड नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या आदरणीय स्व. पी. डी.पाटीलसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व पदाधिकारी नागरिकांनी अभिवादन केले.

निवेदनात असे म्हटले आहे की,- ‘कराड शहरातील वैकुंठ स्मशामभूमीमध्ये कराड शहरातील तसेच कराड शहरानजीकच्या गांवामधील अनेक ग्रामस्थ व नागरिक त्यांच्या नातेवाईकांचे निधन झालेनंतर, पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दहनासाठी आणले जाते. त्यास वेळेचे- काळाचे बंधन कधीच नव्हते. परंतू नुकतेच कराड वैकुंठ स्मशामभूमीत दहनासाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत वैकुंठ स्मशामभूमीत पार्थिव दहन करता येणार नाही, असे फलक आपणांतर्फे वैकुंठ स्मशामभूमी परिसरात लावले आहेत.

खरे पाहता स्मशामभूमीत दहनासाठी पार्थिव आणण्यासाठी वेळेचे घातलेले बंधन अत्यंत चुकीचे, जनतेच्या व समाजाच्या भावनांशी खेळ करणारे आहे. कारण काही नागरिक बंधु-भगिनींचे देहावसान घरी वृध्दापकाळाने, काहीचे अपघाची निधन, काहीचे दुर्धर अशा आजाराने रात्री-अपरात्री निधन होते अशा वेळी नातेवाईकांना पार्थिव जास्त वेळ घरी ठेवणे भावनिक व आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. निधन होणारी व्यक्ती या सर्वच सदन, अर्थिकदृष्ट्या सक्षम असणार नाहीत. आपण जर वेळेचे बंधन घातले तर ज्याची अर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा नागरिकांनी आपल्या नातेवाईकांचे पार्थिव कोठे ठेवायचे? त्यांना ते दवाखान्यात ठेवणे परवडणारे नाही. सध्याची महागाई पाहता नातेवाईकांना दवाखान्याचे बिल भरणे देखील शक्य नसते अशा वेळी आपण वेळेचे बंधन घालून महागाईत आणखी भर घालत आहात. तसेच योग्य वेळेत दहन न करता आलेने होणारी कुटुंबांतील सदस्यांची भावनिक व मानसिक कुचंबना याचा विचार करता हे बंधन सामाजिकदृष्ट्या अनिष्ट व घातक आहे.

सबब या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तरी आपणांस लोकशाही आघाडी व कराड शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करणेत येते की,- सदर वेळेचे बंधन त्वरीत रद्द करावे अन्यथा लोकशाही आघाडीचेवतीने तीव्र आंदोलन केले जाईल, याची नोंद घ्यावी.’ असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री जयवंत पांडुरंग पाटील (काका), उपाध्यक्ष ॲड. विद्याराणी साळुंखे, सचिव नरेंद्र पवार, सहसचिव व मुसद्दीक आंबेकरी, खजिनदार रवींद्र मुंढेकर, सह खजिनदार राकेश शहा यांचेसह माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे, सुहास पवार, उदय हिंगमिरे,शिवाजी पवार, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, प्रविण पवार, अजय सूर्यवंशी, भारत थोरवडे, सोहेब सुतार, अशपाक मुल्ला, दीपक कटारिया, साबीर आंबेकरी, अमरसिंह बटाणे, आदिल आंबेकरी, निहाल मसुरकर, गणेश हिंगमिरे, सोहेल बारस्कर, अबुकर सुतार, प्रताप भोसले, राहुल भोसले, मंगेश वास्के, गणेश कांबळे,सचिन चव्हाण, रोहित वाडकर, चांद पालकर, विनायक पाटील, अहमद मुल्ला, प्रशांत शिंदे,अजिंक्य देव, संजय मोरे, रफिक मुल्ला, सतीश भोंगाळे, रमेश सातुरे आदींनी उपस्थित राहून निवेदनावर सह्या केल्या आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close