अबब…केटीएम गॅंगकडून १०३ तोळे सोने, ५ किलो चांदी जप्त – changbhalanews
क्राइम

अबब…केटीएम गॅंगकडून १०३ तोळे सोने, ५ किलो चांदी जप्त

आंतरराज्य टोळीकडून २७ घरफोड्या उघड : स्थानिक गुन्हे अन्वेषणची दमदार कामगिरी

चांगभलं ऑनलाइन | सातारा

राज्यभरातील पोलीसांना ३ वर्षांपासून पाहिजे असलेली घरफोड्या, चोऱ्या करून धूम स्टाईलने पळून जाणारी आंतरराज्यीय के.टी.एम. गँग जेरबंद करून त्यांचेकडुन २७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन ६७ लाख १९ हजार ८० रुपये किमतीचे १०३ तोळे सोन्याचे दागिने व ५ किलो चांदी आणि २, लाख ८५,हजार रुपये किंमतीची के.टी.एम. मोटार सायकल, लोखंडी कटावणी, लोखंडी कैची, बोल्टकटर, स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ७० लाख ०४ हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मार्च २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीमध्ये सातारा जिल्हयातील मेढा, मल्हारपेठ, वाई, सातारा तालुका, बोरगाव, खंडाळा, शिरवळ, भुईंज, बाई, वाठार, उंब्रज, व वडुज या भागामध्ये दोन ते तीन के.टी.एम. मोटार सायकलवरून ६ ते ७ जण येवून घरफोड्या चोऱ्या करुन पळून जात होते. या गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदरची के.टी.एम. गैंग पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर के.टी.एम. गँगने सातारा, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली जिल्हयातही तसेच कर्नाटक व गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात घरफोडया, चोऱ्या केल्या असल्याने गँगला पकडण्याचे मोठे आव्हान सातारा जिल्हा पोलीस दलासमोर होते.

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सदर गँगला पकडण्याकरीता सपोनि सुधीर पाटील, रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली तपास पथके तयार केली होती. तपास पथकांनी के. टी. एम. गँगची गुन्हे करण्याच्या पध्दतीबाबत अभ्यास करून माहीती घेतली असता सदरच्या गॅगने सातारा जिल्ह्यात दोन ते तीन मोटार सायकलवर येवून एका रात्रीमध्ये सुमारे ८ ते १० बंद असलेल्या घरांच्या घरफोडी करून १२० ते १४० कि.मी. च्या भरधाव वेगाने धूम स्टाईलने पळून गेल्याचे समोर आले होते. त्यामुळे सदर आरोपींबाबत काहीएक माहिती प्राप्त होत नव्हती. त्यामुळे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी एका खबऱ्याला पौड, यवत परिसरात ठेवून सदर टोळीच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले होते. खबऱ्याने सलग ३ महिने गँगच्या हालचालीवर पुणे, पौड, यवत, मुळशी परिसरात लक्ष ठेवले. तसेच मिळेल ती माहिती वेळोवेळी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिली.

ऑगस्ट २०२३ मध्ये खबऱ्याने के. टी. एम. गँगमधील ३ आरोपी पौड परिसर जि.पुणे येथे असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिली. त्याप्रमाणे त्यांनी भुईंज पोलीस ठाणेचे सपोनि रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांचे तपास पथकांना नमुद आरोपींचा पौंड जि. पुणे येथे जावून त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद तपास पथकांनी पौड ता. मुळशी, जि. पुणे येथील डोंगर दऱ्यांमधील परिसरामध्ये भर पावसात सापळा रचला. मात्र १) सुरदेव सिलोन नानावत वय ३३ वर्षे रा. घोटावडे ता. मुळशी जि. पुणे २) राम धारा बिरावत वय ३८ वर्षे रा. करमोळी पो.पौड ता. मुळशी जि. पुणे ३) परदुम सिलोन नानावत वय २५ वर्षे रा. घोटावडे ता. मुळशी जि. पुणे या संशयित आरोपींनी पावसाळी वातावरणाचा फायदा घेवून पोलीस पथकाच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करून शिताफिने त्यांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. नमुद आरोपींना भुईंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयामध्ये अटक करुन त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेतली.
पोलीस कोठडी सदर केटीएम गॅंगच्या संशयितांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सातारा तालुका, मेढा, बोरगाव, खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाई, वाठार, उंब्रज, मल्हारपेठ, वडुज, कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत माहे मार्च २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत घरफोडया करून सोन्या, चांदीचे दागिने व रोख रकमा चोरी केल्या असल्याचे सांगितले. सदरची सोन्या-चांदीचे दागिने हे अहमदाबाद राज्य गुजरात येथील एका महिला सोनार हिस तसेच सोनपालसिंग नारायणसिंग रजपूत व प्रदिप आसनदास खटवानी यांना विकले असल्याचे सांगितले. संशयित आरोपींनी दिलेल्या माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक तात्काळ अहमदाबाद राज्य गुजरात येथे रवाना झाले व तेथून महिला सोनार व प्रदिप आसनदास खटवानी यांना ताब्यात घेतले व दोघांनाही सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

गुन्हयातील निष्पन्न झालेल्या सर्व आरोपींना ताब्यात घेवून देखील घरफोडी चोरीमधील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होत नसल्याने मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे समोर होते. दरम्यान नमुद आरोपींना त्यांनी केलेल्या इतर गुन्हयाचे तपासकामी गुन्हयांमध्ये वर्ग करून त्यांचेकडे तपास सुरु होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी आरोपींच्या साथीदारांबाबत गोपनिय माहिती घेतली असता त्यांना अशी माहिती प्राप्त झाली की, वामन नंदू राठोड रा. फंडवस्ती रांजनगाव जि.पुणे, व वाल्मीक रामभाऊ शेखावत, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे हे वर नमुद मुख्य संशयित आरोपींच्या नेहमी संपर्कात होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि सुधीर पाटील व पोउपनि विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली सुधीर बनकर, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, अजित कर्णे, सनी आवटे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक यांचे तपास पथक तयार केले. नमुद संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यापासून वामन राठोड हा गुजरात येथे पळून गेला होता. त्या अनुषंगाने नमुद तपास पथकाने आरोपी वामन नंदू राठोड व वाल्मीक रामभाऊ शेखावत यांच्या ठावठिकाणाची गोपनिय माहिती प्राप्त करुन त्यांना बोरगाव पोलीस ठाण्यातील गुन्हयाचे तपासकामी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी रवानगी झाली. पोलीस कोठडी चौकशीत आरोपींकडे गुन्हयात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांबाबत सखोल विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, आरोपी १) सुरदेव सिलोन नानावत, २) राम धारा बिरावत, ३) परदुम सिलोन नानावत यांनी सातारा जिल्हयातील सातारा तालुका, मेढा, बोरगाव, खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाई, वाठार, उंब्रज, मल्हारपेठ, वडुज, कराड तालूका पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करुन चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिणे माझ्या मदतीने गुजरात येथील सोनारांचेकडे गहाण ठेवल्याचे सांगीतले.

त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी तपास पथकासह पुन्हा गुजरात राज्यात जावून आरोपींनी सोने ज्या सोनारांकडे गहाण ठेवले होते त्या सोनारांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले सोन्या चांदीच्या दागिण्यांपैकी, चालू बाजारा भावाप्रमाणे ६३ लाख २० हजार ५८० रुपये किंमतीचे १०३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ३ लाख ८८ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ किलो वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करुन सातारा जिल्हयातील मुद्देमाल परराज्यात गुजरात येथे जाऊन हस्तगत करण्याची दमदार कामगिरी केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले ११५ गुन्हे….

साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, असे एकुण ११५ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस
गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ३३८ तोळे सोने (३ किलो ३८० ग्रॅम) असा एकूण २,०६,१८,०००/- (दोन कोटी सहा लाख अठरा हजार रुपये) व ४,४४,०००/- रुपये किंमतीचे ६ किलो वजनाचे चांदीचे दागिने, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

कामगिरी करणाऱ्या पथकात यांचा समावेश….
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, रविंद्र भोरे, भुईंज पोलीस ठाणेचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अमोल माने, अजित कर्णे, मुनिर मुल्ला, राकेश खांडके, सनी आवटे, हसन तडवी, अरुण पाटील, शिवाजी भिसे, राजु कांबळे, अर्जुन शिरतोडे, अमित माने, मनोज जाधव, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक, केतन शिंदे, सचिन ससाणे, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, दलजीत जगदाळे, पंकज बेसके, संभाजी साळुंखे महिला अंमलदार दिपाली यादव, यश्वदा मोरे, मोनाली निकम, शकुंतला सणस, अधिका चीर, प्रिती पोतेकर, मोनाली पवार, काजल साबळे, अनुराधा सणस सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव, फॉरेन्सिक विभागाचे सपोनि रुपाली मोरे, सपोनि विजय जाधव, गजानन तोडकर, मोहन नाचण, राजीव कुंभार, अमोल जाधव, अनिल खटावकर, अमोल निकम, रुद्रायण राऊत यांनी सहभाग घेतला आहे श. दरम्यान, या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close