चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील उंब्रज येथे मसूर फाट्यावर विक्रीसाठी घेऊन आलेला गावठी कट्टा व जिवंत काडतुस सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने सापळा रचून जप्त केले. ही कारवाई शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी दोन संशयित युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. सुदर्शन किरण पाटील वय १९ वर्षे, रा. आटके, तालुका कराड जिल्हा सातारा, मिथीलेश मारुती महिंदकर वय १९ वर्षे, रा.मलकापूर, तालुका कराड जिल्हा- सातारा, अशी अटक केलेल्या संशियताची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी बेकायदेशिर शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. त्या अनुशंगाने पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
शनिवार, दि.१८ नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे खबऱ्याकडून माहिती प्राप्त झाली की, दोन युवक उंब्रज येथील मसूर फाटा परिसरात बेकायदेशिर गावठी कट्टयाची विक्री करण्याकरीता येणार आहेत. सदरची माहिती पो. नि. देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे पथकास देवून त्यांना नमुद इसमांना ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यावरून पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांच्या पोलीस पथकाने मसूर फाटा येथे सापळा शनिवारी सापळा रचला. या परिसरात संशयस्पदरीत्या फिरताना दोघेजण आढळल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता एकाच्या ताब्यात एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ४०,३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. ते दोघे सदरचा गावठी कट्टा विक्री करीता घेवून आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द उंब्रज पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियमान्वये नोंद करून संशयीत दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, केतन शिंदे, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, पंकज बेसके सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांच्या पथकाने केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.
एलसीबीने जप्त केले ६४ गावठी कट्टे…
नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यन्त एकूण ६४ देशी बनावटीचे कट्टे व १६८ काडतुसे आणि ३७७ रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त सातारा येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.