तब्बल 19 गुन्हे दाखल असलेल्या व 9 वर्षापासून फरारी शिराळा तालुक्यातील संशयितास कराड पोलिसांकडून अटक – changbhalanews
क्राइम

तब्बल 19 गुन्हे दाखल असलेल्या व 9 वर्षापासून फरारी शिराळा तालुक्यातील संशयितास कराड पोलिसांकडून अटक

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
घरफोडी, चो-या करणारा व गुन्हा करुन सुमारे 9 वर्षे फरार असलेल्या शिराळा (जि. सांगली ) तालुक्यातील कुख्यात संशयितास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करून बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडील माहिती अशी, सातारा जिल्हा पोलीस दलाचे अभिलेखावरील फरारी व पाहीजे आरोपींचा शोध घेवुन त्यांचेबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी पोलीसांना दिले होते.

दरम्यान, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत सिध्दीपार्क 3, साई गार्डनमागे विद्यानगर, सैदापुर कराड येथील श्री. संजय तुकाराम देसाई, यांचे घरात दिनांक 05.09.2015 रोजी रात्री साडे अकरा ते दि. 06.09.2015 रोजीचे सकाळी 07 वाजण्याच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तीनी कळकाचे काठीस सुपली बांधुन घरातील मोबाईल फोन मुद्दाम लवाडीने चोरुन नेला होता. त्यांचे फिर्यादीवरुन कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये आनंदा भिकाजी थोरात, रा. वाकुर्डे ता. शिराळा जि. सांगली व दिपक महादेव थोरात, मुळ गांव वाकुडे बुद्रुक ता. शिराळा जि. सांगली हल्ली रा. राम मंदिरा समोर, करवडी ता. कराड हे संकेत निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान सदर गुन्ह्यात संशयित आरोपी दिपक महादेव थोरात हा गुन्हा केलेपासुन सुमारे 9 वर्षे आपले अस्तित्व लपवुन पोलीसांचे नजरेआड राहुन पोलीसांना गुंगारा देत होता.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. फौजदार एस. आर. जाधव यांनी करुन आरोपीला फरारी दाखवुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सदरचा गुन्ह्यातील फरारी आरोपीचा शोध घेवुन त्याला जेरबंद करण्याच्या सुचना वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी डी. बी. टीमला दिल्या होत्या. त्याप्रमाणे फरारी संशयित आरोपीची गोपनीय बातमी दारांकडुन माहीती मिळवुन तपासचक्रं फिरवत फरारी संशयित आरोपी दिपक महादेव थोरात मुळ रा. वाकुर्डे ता. शिराळा हा कराड परीसरात आल्याची बातमी वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळालेने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व डीबी टीमला कारवाई करणेच्या सुचना केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका ठिकाणी सापळा रचला. पोलिसांचा सुगावा लागताच संशयित दीपक थोरात याने पलायन सुरू केले. पोलीस अंमलदार आनंदा जाधव यांनी पाठलाग करुन त्यांस शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केलेची कबुली दिली असुन त्यास अटक करण्यास कराड शहर डी. बी. पथकाला यश आले आहे. संशयित थोरात याच्याविरुद्ध तब्बल विविध प्रकारचे 19 गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पुढील कारवाई सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे हे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील, कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार, स. फौ. रघुवीर देसाई, स. फौ. संजय देवकुळे, पोलीस अंमलदार विकास सपकाळ, शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close