सुर्ली गावात उसळला जनसागर : रामकृष्ण वेताळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव – changbhalanews
राजकियराज्य

सुर्ली गावात उसळला जनसागर : रामकृष्ण वेताळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मा. रामकृष्ण वेताळ यांचा 10 जानेवारी रोजी वाढदिवस उत्साहात साजरा झाला.

सकाळी सूर्योदयाबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्या वेताळ यांनी त्यांचे औक्षण केले. आई-वडिलांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी कुलदैवत श्री ज्योतिबा देवाचा अभिषेक केला. यानंतर सुर्ली येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन, सु साई गो पालन संस्था येथे गायींना चारा वाटप, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला आदरांजली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट, जागृती आश्रम शाळा उंब्रज येथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, पाल येथील श्री.खंडोबाचे दर्शन आणि योगेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण, एहसास मतिमंद शाळा वळसे येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप, संत रोहिदास आश्रम शाळा नागझरी ता. कोरेगाव येथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, या सर्व भरगच्च कार्यक्रमानंतर दुपारी तीन नंतर त्यांनी सुर्ली ता. कराड निवासस्थानी उभारण्यात आलेल्या शामियान्यात शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यांना प्रत्यक्ष भेटून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, भाजपा कोरेगाव तालुका अध्यक्ष भीमराव पाटील, कराड उत्तर संयोजक महेश कुमार जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजाराम गरुड, कराड तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, संजय घोरपडे, सुरेश कुंभार रहिमतपूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश माने, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, युवा सेना सातारा जिल्हा प्रमुख कुलदीप क्षिरसागर, किसान मोर्चा लोकसभा समन्वयक सूर्यकांत पडवळ, विश्वासराव काळभोर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत भोसले, विकास गायकवाड, सागर हाके, रणजीत माने, नवीन जगदाळे, अधिक पाटील, शहाजी मोहिते, वेद बहुउद्देशीय सामाजिक संस्था मसूर अध्यक्ष दिपाली खोत, महिला अध्यक्ष सीमा घार्गे, कराड तालुका अध्यक्ष डाँ.सारिका गावडे, स्वाती पिसाळ,अंजली जाधव, पूजा साळुंखे, जाधव,वैशाली मांढरे याचबरोबर अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाजार समितीचे संचालक,भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व रामकृष्ण वेताळ यांच्यावर प्रेम करणाऱ्या खटाव, कोरेगाव, सातारा, कराड,पाटण, कडेगाव यासह सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या .
तर भ्रमणध्वनीद्वारे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री बाळा भाऊ भेगडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, खासदार अनिल बोंडे,आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,महिला जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले,सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे,पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, यांनी शुभेच्छा दिल्या.
आजच्या वाढदिवसाला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सुर्लीच्या माळावर जनसागर उसळल्याचा भास निर्माण होत होता. या प्रचंड जनसागराच्या सोबतीने आणि श्री. छ.खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सायंकाळी नऊ वाजता केक कापून औपचारिक वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 100 पेक्षा जास्त बॅगां रक्त जमा करण्यात आले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे परफेक्ट नियोजन असल्याने आजचा कार्यक्रम करेक्ट झाला असल्याचे जमा झालेल्या युवकांमधून बोलले जात होते. एका अनोख्या आणि दिमागदार सोहळ्यात आजचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याकडून कौतुकाची थाप.
आजच्या वाढदिवसाचे विशेष आकर्षण ठरले ते श्री.छ. उदयनराजे भोसले. त्यांच्या उपस्थितीने आजचा वाढदिवस वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. त्याचबरोबर त्यांनी रामकृष्ण वेताळ यांचा जनसंपर्क, पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि लोकांच्या मनात त्यांची निर्माण झालेले प्रतिमा हीच या जनसागरामध्ये दिसून येत असल्याचे बोलून दाखवल्याने रामकृष्ण वेताळ यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यासारखे झाले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close