अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठेनिमित्त कराड तालुक्यातील या गावात सुरू आहे रामायण कथा सोहळा ; मिळतोय उदंड प्रतिसाद – changbhalanews
आपली संस्कृती

अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठेनिमित्त कराड तालुक्यातील या गावात सुरू आहे रामायण कथा सोहळा ; मिळतोय उदंड प्रतिसाद

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सुर्ली या. कराड येथे संगीतमय रामायण कथेचे आयोजन केले गेले आहे. या संगीतमय रामायण कथा सोहळ्याला आबाल वृद्ध आणि महिलांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे. दि. 16, 17 आणि 18 अशा तीन दिवस संगीतमय रामायण कथा सादर करण्यात येत आहे. ह. भ.प. गुरुवर्य सोनाली दीदी करपे श्री क्षेत्र सद्गुरु कल्याण स्वामी संस्था चकलंबा यांनी ही कथा सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

रामकृष्ण वेताळ साहेब युवा मंच कराड उत्तर यांच्यावतीने सुर्ली ता.कराड येथे या भव्य संगीतमय रामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला संपूर्ण कराड उत्तर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात प्रभू रामचंद्र यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने या रामायण कथा ऐकण्यासाठी उपस्थिती लावत आहेत. सायं. 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सोनाली दीदी करपे यांच्या अमृतमयी आवाजात ही रामायण कथा ऐकण्यासाठी गर्दी उसळत आहे. याच ठिकाणी प्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन दिवस गर्दीचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे.

या संगीतमय रामायण कथा सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले आहे. व्यासपीठ, बैठक व्यवस्था आणि प्रसादाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे ठेवलेली असल्याने ही रामायण कथा ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. सुर्लीसह परिसरातून श्रोते , भाविक रोज सायंकाळी हजेरी लावत आहेत. या भक्तीमय वातावरणाचा आनंद घेत आहेत. रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांच्यावतीने बैठकीचे चोख नियोजन केलेले आहे.

रामायण कथा घराघरात पोहोचावी हाच उद्देश….
अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. अशा वेळी रामायण कथा घराघरात आणि सर्व नागरिकांना ऐकायला मिळावी या उदात्त हेतूने या कथेचे आयोजन केले आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनातून आदर्श घेऊन प्रत्येकाने आपले जीवन सुखकर करावे हाच कथा आयोजनाचा हेतू आहे.
रामकृष्ण वेताळ,
समन्वयक, सातारा लोकसभा मतदारसंघ.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close