समाजाला प्रेरीत करणारे व्यक्तीमत्त्व ; संदिप पवार साहेब
मनात विचारांचे एक पानही हालत नाही. रोजच्याच माणसांशी,
घरातल्या लोकांशी तुम्ही दररोज नव्याने नाते जोडता आहात.
एक अतीव समजूतदारपणा तुमच्यात भरलेला आहे. हेतूविरहित प्रेम आणि करुणेने तुमचे मन व्यापलेले आहे. प्रपंचातच नव्हे तर सामाजिक जीवनात जे काही सुख-दुःख आहे ते दूर करण्यासाठी तुम्ही विनातक्रार सतत भावनिक होत प्रयत्न करता आहात….
हो हे करत असतानाच….’मी समाजासाठी हे केलं…मी ते केलं….अमक्याला मदत केली…तमक्याला सावरले’
असली स्वार्थी अभिलाषा न बाळगता…. यश, प्रसिद्धी, वैभवाचा झगमगाट याचा हव्यास न धरता अगदी तरल तरल संवेदनक्षमतेने
ज्यांच्या जगण्याचा प्रत्येक दिवस उजाडतो आणि मावळतो….ते नाव म्हणजे संदिप पवार साहेब….!
अपवादात्मक लोक वगळता आत्ताच्या असंवेदनशील समाजात संदिप पवार यांचे नाव अनेकांच्या काळजात कोरले गेले आहे. असंवेदनशीनलतेत संवेदनशील रहात प्रत्येकाच्या अडचणीवर यशस्वी मार्ग शोधून काढणारा हा व्यक्ती क्षणोक्षणी अनेकांच्या आयुष्याला आनंदाची, समाधानाची किनार देतो. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांच्या ‘संदिप पवार’ या नावासमोर अगदी आदराने ‘साहेब’ ही बिरूदावली मनातून जोडली जाते. मला साहेब म्हणावे म्हणून समाजात काडीचेही योगदान न देणारे जिवाचे रान करतात ही आत्ताची परिस्थिती. या परिस्थितीत संदीप पवार हे त्यांच्या आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या तर कधी आपलेपणाने कठोर होत अनेकांच्या ‘मनातले साहेब’ होतात.
कराड अर्बन बॅंक…ही जनसामान्यांच्या उन्नतीचे प्रतिक आहे. ही बॅंक आणखी मोठी झाली पाहिजे….बॅंकेच्या माध्यमातून समाजाचे व्यापक हित साधले पाहिजे एकमेव ही भावना जपत संदिप पवार साहेब हे सतत कार्यरत आहेत. बॅंकेत त्यांना अनेकदा भेटायला गेलो तर त्यांच्यासमोर कोणी ना कोणी आपली अडचण घेऊन बसलेला असतोच… समोर बसलेल्याची व्यथा जाणून घेत पवार साहेब नियमाच्या चौकटीत त्याला शक्य तेवढी मदत करण्यासाठी फोनाफोनी करताना वेळेचे भान पहात नाहीत. मग ती व्यक्ती एखादी अगदीच गरजू असते किंवा अगदीच नावाजलेलीही असते.
दुर्दैवाने संकटात अडकलेले कितीतरीजण, आपल्या माता, भगिणींसह अनेक बांधव त्यांच्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी येतात….पण पवार साहेबांच्या आधारानंतर बाहेर पडताना नक्कीच त्यांचे चेहरे हसतमुख असतात हे अनेकदा अनेकांनी अनुभवले आहे.
कराड अर्बन बॅंक ही केवळ संस्था नव्हे तर समाजातील उपेक्षित, बेरोजगार, आयुष्यात येऊन काहीतरी करून दाखवायचे ही जिद्द बाळगणारांसाठी कृष्णा-कोयनेसारखी वरदायिनी आहे. हे भाव मनात ठेवत आजही संदिप पवार साहेबांची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत एक खंत मात्र त्यांच्या मनात कायम असते….ती म्हणजे त्यांचे बंधू स्व. समीर पवार यांच्या आठवणीची….
स्व. समीर पवार यांच्या आठवणीने संदिप पवार साहेब हे कमालीचे भावूक होतात. त्यांच्या बोलण्यात एक थरथरलेपणा येतो. पण याच भावाचे नाव खूप मोठे व्हावे म्हणून पवार साहेब प्रत्येक सामाजिक उपक्रमात आई, वडिल, भाऊ यांच्यासह सर्व कुटूंबियांच्या सहकार्याने सहभागी होतात. पण ते कधीही स्वतः मान सन्मान घ्यायला कोणत्याही व्यासपीठावर जातही नाहीत अन केलेल्या मदतीची पुनर्वाच्यताही करत नाहीत.
आजकालच्या केवळ अन् केवळ स्वार्थी जगात या माणसाच्या मनाचा ठाव घेणे खरचं अवघड आहे. कारण संदिप पवार साहेब हे माणसातील ‘विठ्ठल’ आहेत असे म्हणायला नक्कीच वाव आहे. आज त्यांचा वाढदिवस…कितीही लिहले तरी ते कमीच पडेल….पवार साहेबांना ‘चांगभलं न्यूज’ समूहाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..पवार कुटूंब असेच बहरत, आनंदात रहावे या सदिच्छा!
– हैबतराव आडके, संपादक, चांगभलं.
आपणही शुभेच्छा देऊ शकता..!
आदरणीय संदीप पवार साहेब यांना खालील नंबरवर आपण संपर्क करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता..
Mobile – 98232 87810