कलाकारांच्या मागण्यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन
सुनील तोरणे व अश्विनी तोरणे यांचा पुढाकार
चांगभलं ऑनलाइन | सांगली
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना कलाकारांच्या मागण्यांचे निवेदन कलाकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनिल तोरणे (प्रबोधनकार पोतराज), सांगली जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी सौ. अश्विनी सुनिल तोरणे आदींच्यावतीने देण्यात आले.
यावेळी पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बापू खरात, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, सांगली जिल्हा संघटक नवनीत लोंढे, सांगली जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष तुषार लोंढे, महिला आघाडी सांगली जिल्हा सचिव अलका भंडारे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, खानापूर तालुका मुस्लिम आघाडी अध्यक्ष बशिरभाई मुजावर, खानापूर तालुका उपाध्यक्ष शरद घाडगे, पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कलाकारांना विविध प्रश्न भेडसावत असतात. त्यांची सोडवणूक शासन दरबारी होणे आवश्यक आहे. तसेच कलाकारांचे मानधन व त्याबाबतचे प्रश्न शासनाने तातडीने लक्ष देऊन सोडवण्याची आवश्यकता आहे, आधी बाबत लक्ष वेधत कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुनील तोरणे यांनी कलाकारांच्या मागणीचे निवेदन ना. रामदास आठवले यांच्याकडे दिले. दरम्यान, या निवेदनातील मागण्यावर राज्य शासनाकडे तसेच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू , अशी ग्वाही ना. आठवले यांनी यावेळी दिली.