रजनीदेवी पाटील यांच्या रक्षा विसर्जन विधीला राज्यातील मान्यवरांसह जिल्ह्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित – changbhalanews
Uncategorized

रजनीदेवी पाटील यांच्या रक्षा विसर्जन विधीला राज्यातील मान्यवरांसह जिल्ह्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ.रजनीदेवी पाटील यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि.१४ रोजी कराड येथील वैकुंठधाम येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. या विधीला राजकीय, सामाजिक, सहकार, प्रशासकीय, शैक्षणिक, सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्हाभरातून मोठा जनसमुदाय उपस्थित राहिला होता.

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, रा.स.प.चे नेते महादेव जानकर यांनी रविवारी फोनवरून तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, शिवसेना नेते खा.संजय राऊत, आ.दिपक चव्हाण, आ.मानसिंगराव नाईक, आ.अरूण लाड यांनी निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.

आ.बाळासाहेब पाटील, डॉ.अतुल भोसले, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, आ. अनिल बाबर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अनिल देसाई, मदनराव मोहिते, राजेश पाटील, हिंदुराव पाटील, हर्षद कदम, इंग्रजीत गुजर आदींनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. तसेच शनिवार दि.१३ रोजी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, आ.मकंरद पाटील, पुसेगावचे मठापती सुंदरगिरी महाराज, माजी खासदार निवेदिता माने, आ.रविंद्र धंगेकर आ.संजय जगताप, नितिन भरगुडे पाटील, तात्यासाहेब लहाने, बीव्हीजीचे हणमंत गायकवाड, माजी आमदार शिवाजीराव नाईक, उदय कबुले यांनी प्रत्यक्ष भेटून खा.श्रीनिवास पाटील व कुटुंबियांचे सांत्वन केले.

आ.जयंत पाटील म्हणाले, सौ.रजनीदेवी पाटील यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत त्यांना अविरतपणे साथ दिली. त्यांच्या जाण्याने पाटील कुटुंबीयांचा आधार हरपला असून सर्व राष्ट्रवादी परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

आ.बाळासाहेब पाटील म्हणाले, सौ.रजनीदेवी पाटील ह्या खा.पाटील साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. प्रशासकीय काळात राज्याच्या अनेक भागात गेल्यानंतर त्यांनी खासदार साहेबांना साथ दिली. राजकिय जीवनात देखील त्या सातत्याने पाठीशी राहिल्या. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

डॉ.अतुल भोसले म्हणाले, सौ.माईंचे अल्पशा आजाराने झालेले निधन अतिशय धक्कादायक आहे. गेली ५६ वर्ष खासदार साहेबांच्या पाठीशी त्या राहिल्या. त्यांच्या जाण्याने कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले, सौ.माईंच्या आकस्मिक निधनाने धक्का बसला. त्यांचा प्रेमळ स्वाभावाने त्यांनी असंख्य माणसे जोडली. एक आई म्हणूनही त्यांनी चांगली जबाबदारी संभाळली. त्यांच्या जाण्याने मायेची सावली हरपली.

प्रभाकर घार्गे म्हणाले, जनमाणसात सौ.माईंच्याबद्दल मोठी प्रेमाची भावना आहे. त्यांनी आपल्या अचरणातून मराठीपणा जपण्याचा प्रयत्न केला. हिंदुराव पाटील म्हणाले, सौ.माईच्या निधनामुळे मोठा आघात झाला आहे. अनिल देसाई म्हणाले, माईंच्या निधनाने पाटील कुटुबांचा आधार हरपला. माण-खटाव जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

यावेळी बारामतीचे चंद्रहार तावरे, मनोहर शिंदे, सुभाषराव शिंदे, मानसिंगराव जगदाळे, अजित पाटील चिकलीकर, सौरभ पाटील, निवास थोरात, विक्रमबाबा पाटणकर, देवराजदादा पाटील, भिमराव पाटील वाठारकर, सिद्धेश्वर पुस्तके, सौ.माई साळुंखे, संजय देसाई, विलास बाबा जळव, रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी, हेमंत जाधव, निलेश साळुंखे, जयंवतराव साळुंखे, पी.डी.लाड, शिवाजीराव महाडिक, जयवंतराव मोहिते, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, विलासराव सोळुखे, रामदास माने, कराडचे डीव्हायएसपी अमोल ठाकुर, कराडचे पोलिस निरिक्षक प्रदिप सुर्यवंशी, शेतकरी संघटनेचे राजू शेळके, प्रविण पाटील, दादा साळुंखे, सौरभ पाटील, संग्राम पाटील तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी,

विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायती व विविध संस्थेचे पदाधिकारी, सनबीम परिवार, नागरिक व महिला मोठ्यात संख्येने उपस्थित होत्या.

सिक्कीम मध्ये वाहिली श्रद्धांजली –
सिक्कीमच्या गंगटोक राजभवनातील कर्मचाऱ्यांनी रजनीदेवी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

मारूल हवेलीत कडकडीत बंद…
रजनीदेवी पाटील यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मारूल हवेली येथे दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी सर्व व्यवहार व दुकाने बंद ठेवली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close