जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त इनरव्हील क्लब कराड संगमचा मदतीचा हात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्यावतीने दिव्यांगांसाठी उपयुक्त साहित्याचे वाटप केले.
डॉ.द.शि.एरम मूकबधिर विद्यालयाच्या वसतीगृहातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी ४५ बेडशीट क्लबच्यावतीने भेट देण्यात आली.
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम दिव्यांग सप्ताह निमित्त दरवर्षी दिव्यांग मुलांसाठी विविध उपक्रम राबवित असतो.
क्लबच्यावतीने दरवर्षी दिव्यांगांना आवश्यक साहित्य भेट, दिव्यांग सप्ताह जनजागृती रॅली, तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी इत्यादी उपक्रम राबवीत असतो. या कार्यक्रमांमध्ये क्लबच्या प्रेसिडेंट तरुणा मोहिरे यांनी क्लबच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. क्लब सेक्रेटरी छाया पवार यांनी यापुढे सुद्धा क्लबच्यावतीने विद्यालयाला मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. जयश्री गुरव यांनी क्लबच्यावतीने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले व क्लबच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. कराडमध्ये इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमने आपल्या चांगल्या कामातून समाजामध्ये आपला चांगला ठसा उमटवला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
शाळेच्या मुख्याध्यापिका हनमसागर मॅडम यानी सर्वांचे स्वागत केले. निरंजन साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, क्लब सदस्य सारिका शहा, विद्या पावसकर, पुष्पा चौधरी, माहेश्वरी जाधव, सुषमा तिवारी, दीपाली लोहार, वृषाली पाटणकर , अपूर्वा पाटणकर, स्नेहांकि आवळकर, सुकेशीनी कांबळे, शिल्पा पवार, कोमल शिंदे आदी उपस्थित होते.