क्राइम
स्त्री जातीचे अर्भक गटारात आढळल्याने खळबळ
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
उंब्रज ता. कराड येथील गटारात स्त्री जातीचे पुर्ण वाढ झालेले अर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याने उंब्रजमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना गुरुवार, दि. ३० रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बाॅल गटारात गेल्याने ही घटना उजेडात आली. दरम्यान घटनास्थळी उंब्रज पोलिसांनी पंचनामा करुन अर्भक ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर सदर अर्भकाविषयी अधिकची माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
गटारात मिळालेले अर्भक स्त्री जातीचे असून पुर्ण वाढ झालेले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते गटारात असल्याचा कयास असून त्याची दुर्गधी पसरली होती.