जागतिक महिला दिनानिमित्त कराडला झाला फॅशन शो
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब कराड संगमच्यावतीने महिलांसाठी मारवाडी, गुजराती, राजस्थानी लूक ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले होते. त्याला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाची सुरुवात कराडमधील विविध स्त्रियांच्या संघटनांच्या प्रमुखांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, इनरव्हिल कराड प्रेसिडेंट सिमा पुरोहित, लोकमतच्या स्नेहा तोडकर, पत्रकार रुपाली जाधव , तरुण भारतच्या सरिता घारे, पुढारीच्या स्वप्नाली पाटील, महिला मर्चंटच्या अध्यक्ष कविता पवार, इनरव्हील कराडच्या चार्टर प्रे. रेखा काशीद, यशराजच्या नंदा विभूते, के एम एसच्या शितल जगताप, अंगणवाडी सुपरवायझर वंदना केंजले, श्वेता गोल्डच्या शीतल कदम, मुक्तगिरीच्या संजना शिंदे, राधा महिला मंडळाच्या रूपा पावसकर , लायन्स कॅबिनेट ऑफिसर विद्या मोरे, आय एम एम च्या डॉ. शैलजा कुलकर्णी, स्टुडिओ 11 च्या प्रज्ञा शेट्टी, धस्के , रणरागिणीच्या प्रतिभा साखरे आणि रोटरी क्लब कराड प्रे. बद्रीनाथ धस्के, क्लब प्रे. तरुणा मोहिरे , से. छाया पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटात 3 नंबर काढून त्यांना रोख रककम , मेमेंटो आणि सर्टीफिकेट देण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांमधून आणखी स्पेशल 4 बक्षिसे काढण्यात आली. या स्पर्धेचे वैशिष्ट असे की यात 5 वर्षाच्या मुलीपासून ते 83 वर्षाच्या आजीपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक महिलेच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेची थीम ठेवून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. याची सुरुवात नववधू लूक, महाराष्ट्रीयन वेशभूषा, नंतर साऊथ इंडियन लूक आणि या वर्षी मारवाडी अशा विविध प्रकारच्या थीमने करण्यात आली.
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. त्याचे सादरीकरण अशा विविध वेशभूषेतून करण्यात येते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून रेणू येळगावकर, नीता शिंदे, प्रगती जाधव यांनी काम पाहिले. यावेळी क्लबकडून दरवर्षी आदर्श माता पुरस्कार दिला जातो, त्याचे वितरण करण्यात आले. जी महिला अतिशय कष्टाने आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे करते अशा महिलेला हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी इस्लामपूर येतील वंदना मोहोटकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.ज त्यांनी शिलाई काम करून आपल्या 3 मुली सरकारी नोकरी लावल्या आहेत . आणि चौथी मुलगी डॉक्टर (वैद्यकीय) शिक्षण घेत आहे. या वेळी क्लब मधील मेंबरच्या मुलामुलींनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री खाकरा, मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, मोहिरे भांडी स्टोअर्स आणि श्वेता गोल्ड, स्टुडिओ 19 हे प्रायोजक होते. या वेळी चार लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात आले. बक्षीस समारंभ तरुणा मोहिरे,हसारिका शहा, पुष्पा चौधरी आणि शितल कदम यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व क्लब मेंबर यांनी परिश्रम घेतले.