महाराष्ट्रात जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर – पहा सविस्तर जिल्हानिहाय यादी – changbhalanews
राजकियराज्य

महाराष्ट्रात जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर – पहा सविस्तर जिल्हानिहाय यादी

मुंबई, दि.१२ | विशेष प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी अधिसूचना काढून राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष व सभापती पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानंतर नव्या आरक्षण तत्त्वानुसार ही यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदे तसेच पंचायत समिती सभापती पदांची प्रवर्गनिहाय विभागणी जाहीर झाली आहे.

जिल्हानिहाय जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण
ठाणे – सर्वसाधारण (महिला), पालघर – अनुसूचित जमाती, रायगड – सर्वसाधारण, रत्नागिरी – मागास प्रवर्ग (महिला), सिंधुदुर्ग – सर्वसाधारण, नाशिक – सर्वसाधारण, धुळे – मागास प्रवर्ग (महिला), नंदुरबार – अनुसूचित जमाती, जळगाव – सर्वसाधारण, अहमदनगर – अनुसूचित जाती (महिला), पुणे – सर्वसाधारण, सातारा – मागास प्रवर्ग (महिला), सांगली – सर्वसाधारण (महिला), सोलापूर – मागास प्रवर्ग, कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला), छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण, जालना – मागास प्रवर्ग (महिला), बीड – अनुसूचित जाती (महिला), परभणी – अनुसूचित जाती, हिंगोली – मागास प्रवर्ग, नांदेड – मागास प्रवर्ग (महिला), धाराशिव – सर्वसाधारण (महिला), लातूर – सर्वसाधारण (महिला), अमरावती – सर्वसाधारण (महिला), अकोला – अनुसूचित जमाती (महिला), वाशिम – अनुसूचित जमाती (महिला), बुलढाणा – सर्वसाधारण, यवतमाळ – सर्वसाधारण, नागपूर – मागास प्रवर्ग, वर्धा – अनुसूचित जाती, भंडारा – मागास प्रवर्ग, गोंदिया – सर्वसाधारण (महिला), चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला), गडचिरोली – सर्वसाधारण (महिला).

जिल्हानिहाय पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण…
ठाणे जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांपैकी एक अनुसूचित जाती, एक मागास प्रवर्ग, एक सर्वसाधारण आणि एक सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. पालघरमध्ये दोन समित्या असून त्यापैकी एक अनुसूचित जमाती (महिला) व एक मागास प्रवर्गासाठी आहे. रायगडच्या १५ समित्यांत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) प्रत्येकी एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण चार आणि सर्वसाधारण (महिला) चार अशी विभागणी झाली आहे.
रत्नागिरीतील नऊ समित्यांत मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण तीन आणि सर्वसाधारण (महिला) चार आहेत. सिंधुदुर्गच्या आठ समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) दोन आहेत. नाशिकच्या दहा समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती दोन, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण एक आणि सर्वसाधारण (महिला) एक आहेत.
धुळेच्या दोन समित्यांत मागास प्रवर्ग एक आणि सर्वसाधारण (महिला) एक आहे. नंदुरबारच्या पंधरा समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती दोन, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) चार आहेत. अहमदनगरच्या १३ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) तीन आहेत.
पुण्यातील १३ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) चार आहेत. साताऱ्यातील ११ समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण चार व सर्वसाधारण (महिला) तीन आहेत. सांगलीच्या १० समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) तीन पदे आहेत.
सोलापूरमध्ये ११ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन आणि सर्वसाधारण (महिला) तीन आहेत. कोल्हापूरच्या १२ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण चार व सर्वसाधारण (महिला) तीन आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या नऊ समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) तीन आहेत.
जालना जिल्ह्यातील आठ समित्यांत अनुसूचित जाती एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण दोन व सर्वसाधारण (महिला) तीन आहेत. परभणीच्या नऊ समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) तीन पदे राखीव झाली आहेत. हिंगोलीच्या पाच समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक आणि सर्वसाधारण एक पद आहे.
बीडच्या ११ समित्यांत अनुसूचित जाती एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) चार आहेत. नांदेडच्या १६ समित्यांत अनुसूचित जाती दोन, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन व सर्वसाधारण (महिला) चार आहेत. धाराशिवच्या आठ समित्यांत अनुसूचित जाती एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण दोन आणि सर्वसाधारण (महिला) तीन आहेत.
लातूरच्या १० समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन आणि सर्वसाधारण (महिला) दोन पदे आहेत. अमरावतीच्या १२ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) दोन, अनुसूचित जमाती एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण दोन आणि सर्वसाधारण (महिला) दोन आहेत.
अकोल्याच्या सात समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण एक आणि सर्वसाधारण (महिला) एक पद आहे. वाशिमच्या सहा समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण दोन आणि सर्वसाधारण (महिला) एक आहे.
बुलढाण्याच्या १३ समित्यांत अनुसूचित जाती दोन, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण दोन आणि सर्वसाधारण (महिला) तीन आहेत. यवतमाळच्या १६ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती दोन, अनुसूचित जमाती (महिला) दोन, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन आणि सर्वसाधारण (महिला) तीन आहेत.
नागपूरच्या १३ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण दोन आणि सर्वसाधारण (महिला) तीन आहेत. भंडाऱ्याच्या सात समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण एक आणि सर्वसाधारण (महिला) दोन आहेत.
गोंदियाच्या आठ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण दोन आणि सर्वसाधारण (महिला) दोन आहेत. चंद्रपूरच्या १५ समित्यांत अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती (महिला) दोन, मागास प्रवर्ग दोन, मागास प्रवर्ग (महिला) दोन, सर्वसाधारण तीन आणि सर्वसाधारण (महिला) तीन आहेत. वर्ध्याच्या आठ समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती एक, मागास प्रवर्ग एक, मागास प्रवर्ग (महिला) एक, सर्वसाधारण दोन आणि सर्वसाधारण (महिला) दोन आहेत. गडचिरोलीच्या पाच समित्यांत अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती (महिला) एक, मागास प्रवर्ग दोन आणि मागास प्रवर्ग (महिला) एक असे आरक्षण ठरले आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण जाहीर….

ग्रामविकास विभागाच्या दि. 9 सप्टेंबर 2025 च्या अधिसुचनेनुसार सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यामधील सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीही आरक्षण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जातीसाठी (महिला) – 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-2, सर्वसाधारण प्रवर्ग-4, सर्वसाधारण महिला-3 या प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

उमेदवारांची चाचपणी झाली सुरू….

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळावे या हेतूने ही आरक्षण यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हानिहाय आणि प्रवर्गनिहाय वाटपामुळे आगामी स्थानिक निवडणुका अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. ग्रामविकास विभागाने काढलेल्या या अधिसूचनेमुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद व पंचायत समिती सभापती पदांसाठी उमेदवारांची राजकीय चाचपणी आता सुरु होणार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close