स्वप्नाली चव्हाणचे अभूतपूर्व यश – पहिल्याच प्रयत्नात मिळवला लेफ्टनंटचा मान ; कराड-कडेगावची कन्या

कराड , दि. २५ | चांगभलं वृत्तसेवा
कडेगाव तालुक्यातील तडसर (जि. सांगली) गावची कन्या स्वप्नाली अशोक चव्हाण हिने भारतीय सेनादलात लेफ्टनंट पदावर निवड होऊन अभूतपूर्व यश संपादन केले आहे.
स्वप्नाली चव्हाण ही विद्यानगर, कराड येथील जीवन पवार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची विद्यार्थिनी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षेत तिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.
एका शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या स्वप्नालीने दोन वर्षे जीवन पवार सर यांच्याकडे मार्गदर्शन घेतले होते. तिच्या यशाबद्दल मार्गदर्शन केंद्रात तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी सौ. छाया पवार, ओंकार पवार, हिम्मतराव पाटील, विनया डकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वप्नालीच्या या यशाबद्दल गावात आणि संपूर्ण कराड परिसरात अभिमान व्यक्त होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.